Saif Ali Khan: सैफने पतौडीचे दर्शन घडवले, चाहत्यांना सांगतो, 'प्रत्येक खोलीत माझे...'

सैफ अली खानचा पतौडी पॅलेस नेहमीच चर्चेत असतो. सैफ जेव्हा-जेव्हा पॅलेसमध्ये कुटुंबासोबत सुट्टी घालवायला जातो, त्यावेळी तो काही खास फोटो शेअर करत असतो.
Saif Pataudi House
Saif Pataudi HouseSaam Tv

Saif Ali Khan Pataudi House: सैफ अली खानचा पतौडी पॅलेस (Pataudi House) नेहमीच चर्चेत असतो. सैफ जेव्हा-जेव्हा पॅलेसमध्ये कुटुंबासोबत सुट्टी घालवायला जातो, त्यावेळी तो काही खास फोटो शेअर करत असतो. तेव्हा नेहमीच या अलिशान राजवाड्याची हमखास चर्चा होतेच. यावेळी एका जाहिरातीसाठी सैफने त्याच्या जुन्या घराचा फेरफटका मारला आहे. यामध्ये राजवाड्याच्या बाहेरील कारंज्यापासून ते प्रत्येक खोलीपर्यंत तो आपल्या चाहत्यांना दर्शन घडवून देत आहे. (Saif Ali Khan)

Saif Pataudi House
Punjabi Actress Daljeet Kaur : पंजाबी चित्रपटसृष्टीतील 'हेमा मालिनी'चे झाले दीर्घ आजाराने निधन

यापूर्वी काही जुनी छायाचित्रेही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ते राजवाड्यातील काही खास जुन्या आठवणींना उजाळा देतात. पतौडी पॅलेसचा आतला व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Social Media)

व्हिडिओमध्ये राजवाड्याचा परिपूर्ण घुमट त्याच्या मागचे भव्य आणि सुंदर कारंजे दिसत आहेत. पॅलेसमधील सुंदर भिंती, जुन्या पेंटिंग्ज, चित्रे, लाकडी वस्तु आणि काचेच्या कॅबिनेटने सजवलेल्या दिसत आहेत. शिवाय कित्येक शानदार गुलाबी रंगाचे सोफे आणि इतर भव्य वस्तू पाहताना आपण हरवून जातो. राजवड्यातील प्रत्येक कोपरा सुंदर कलाकृती, फुलदाण्या आणि इतर आकर्षक गोष्टींनि सुशोभित केलेला आहे.

सैफ अलीच्या पतौडी पॅलेसबद्दल माहिती

हरियाणाच्या (Hariyana) गुरुग्राममध्ये पतौडी पॅलेस आहे. हे पॅलेस 1972 मध्ये बांधण्यात आले होते. पतौडीचे शेवटचे शासक इफ्तिखार अली खान यांच्या निधनानंतर हा राजवाडा त्यांचा मुलगा मन्सूर अली खान आणि त्याची पत्नी शर्मिला टागोर यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

हा वाडा आता कुटुंबाची वडिलोत्पार्जित मालमत्ता आहे. असे म्हणतात की या आलिशान पॅलेसची काळजी घेणारे कोणी नव्हते, त्यामुळे 2005 ते 2014 पर्यंत तो नीमराना हॉटेल ग्रुपला भाड्याने देण्यात आले होते, परंतु सैफने तो परत विकत घेण्याची ऑफर दिली आणि तो या पतौडी पॅलेसचा मालक बनला.

पतौडी पॅलेस जवळपास 10 एकरमध्ये पसरलेला आहे. शतकानुशतके जुन्या आणि हेरिटेजने भरलेल्या या महालाची किंमत 800 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात जलतरण तलावापासून शेतीपर्यंत सर्व काही आहे. या पॅलेसमध्ये जवळपास शंभरहून अधिक खोल्या आहेत. त्याच्या प्रत्येक विटेला जुन्या आठवणी जोडलेल्या आहेत. सैफ अली खानचे संपूर्ण कुटुंब आपला फावला वेळ घालवण्यासाठी भेट देतात.

Saif Pataudi House
Babbu Maan: धक्कादायक! सिद्धू मुसेवालानंतर आणखी एका गायकाला जीवे मारण्याची धमकी

सैफ अली यापुर्वी विक्रम वेधा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर त्याचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' प्रेक्षकांच्या भेटीला पुढच्या वर्षात येणार आहे. या चित्रपटातील रावणाच्या भूमिकेमुळे तो चांगलाच ट्रोल झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com