Deepika Padukone social media
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: प्रेग्नंसीनंतर दीपिका पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर, आरोग्याबाबत दिली माहिती...

Deepika Padukone Health Update: मुलीला जन्म दिल्यानंतर अभिनेत्री दीपिका पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आली होती. त्यादरम्यान दीपिकाच्या आईने तिच्या आरोग्याबद्दल अपडेट दिली आहे.

Saam Tv

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्र दीपिका पाडुकोण सध्या तिच्या मातृत्वाच्या प्रवासाचा आनंद घेताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिकाने सध्या बॉलिवूडमधून थोडासा ब्रेक घेऊन तिच्या मुलीसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिका तिचा हा प्रवास तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करते. दीपिकाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे.

हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी अभिनेत्री दीपिका आणि रणवीर सिंह यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरामध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर 'आम्ही एका गोंडस मुलीचे आई बाबा झालो' अशी आनंदाची बातमी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.

प्रेग्नेंसीनंतर दीपिका पादुकोणच्या आईने उज्जला यांनी तिच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. दीपिका पादुकोण तिच्या बहिणी आणि आईसह शनिवारी मुंबईमधील एका रेस्टॉरेंटमध्ये जेवायला गेल्या होत्या. रेस्टॉरेंटमधून बाहेर येताच पापाराझींनी त्यांना पोज देण्यास सांगितले. त्यादरम्यान दीपिका आणि तिची आई खुप खुश दिसत हेती. पापाराझींनी दीपिकाला तिच्या प्रकृतिबद्दल विचारले तेव्हा दीपिकाच्या आईने सांगितले की," आता तिची तब्येत ठीक आहे. " त्यानंतर पापाराझींचे दीपिकाच्या आईने आभार मानले आणि त्या तिथून निघाल्या. दीपिकाने ७ सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला.

दीपिकाने 'कल्की 2898 AD'या चित्रपटामध्ये सुमती (Sum 80) नावाच्या गर्भवती महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन यांसारखे मोठे कलाकार देखील होते. आता चाहत्यांना दीपिकाच्या 'सिंघम अगेन' या आगामी चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे. या चित्रपटामध्ये दीपिका एसीपी शक्ती शेट्टी (लेडी सिंघम) या भूमिकेत दिसणार आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

Bharli Vangi Recipe : गावरान भरली वांगी, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT