Kangana Ranaut Saam Digital
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Post : "हे योग्य असेल तर, बलात्कार अन् खूनही..."; कंगणा रणौतने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

Kangana Ranaut News : अभिनेत्री कंगना रणौत यांनी थप्पड प्रकरणानंतर एक X पोस्ट शेअर केलेली आहे. त्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावले आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत खासदार झाल्यापासून कमालीच्या चर्चेत आल्या आहेत. गुरूवारी अभिनेत्री कंगना चंदीगढ विमानतळावरून दिल्लीला जात होत्या. यावेळी एका महिला CISF कॉन्स्टेबलने तिच्या कानशिलात लगावली. कंगनाला मारल्यामुळे बॉलिवूडमधून म्हणावा तसा प्रतिसाद उमटला नाही.

घटनेनंतर कंगना यांनी त्या महिला CISF कॉन्स्टेबल विरोधात एफआयआर नोंदवली होती. आज त्या महिला CISF कॉन्स्टेबल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंगनाने एक X पोस्ट शेअर केलेली आहे. त्या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

कंगना रणौतने X वर या प्रकरणानंतर पोस्ट लिहिली आहे. ती म्हणाली, "प्रत्येक बलात्कारी, खुनी किंवा चोराकडे गुन्हा करण्यासाठी नेहमीच एक मजबूत भावनिक, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक कारण असतं. आरोपीकडून कोणताही गुन्हा विनाकारण घडत नाही. तरीही त्यांना दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. जर तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित असाल तर देशाच्या सर्व कायद्यांचे उल्लंघन करून गुन्हा करण्याची तीव्र प्रेरणा येणारच."

कंगनाने पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "लक्षात ठेवा, जर कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्याच्या खासगी क्षेत्रात प्रवेश केला, तर त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याच्या शरीराला स्पर्श करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करत असाल तर तुम्ही बलात्कार किंवा खून करणं ठिक आहे, असं म्हणाला. यामुळे घुसखोरी करणं किंवा एखाद्याला चाकूने भोसकणं ही गोष्ट तुम्हाला मोठी वाटणार नाही. या गोष्टीचा तुम्ही खोलवर जाऊन विचार करा. गुन्हेगारी मानसिक प्रवृत्तींना मी इतकंच सांगेल की, " तुम्हाला योग आणि ध्यान करण्याचा मी सल्ला देईन. नाहीतर तुम्हाला तुमचं जीवन एक कटू अनुभव देईल. कृपया दुसऱ्याविषयी जास्त द्वेष आणि मत्सर बाळगू नका. स्वतःला त्यातून मुक्त करा."

'शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल' कंगना रणौतला कानाखाली मारणाऱ्या CISF महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरच्या विरोधात आता आयपीसी कलम 323 आणि 341 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गु्न्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्या CISF महिला कॉन्स्टेबलला घटनेच्या काही तासानंतर लगेच निलंबित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT