बॉलिवूडची अप्सरा म्हणजे ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सर्वत्र तिच्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, लग्नाआधी ऐश्वर्याचे नाव भाईजान म्हणजेच सलमान खानसोबत (Salman Khan) जोडले गेले होते. ते दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांचे नाते पुढे गेले नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला. ऐश्वर्या रायने सलमान खानसोबतच नातं का तोडलं यावर एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
एका मीडिया मुलाखतीत ऐश्वर्याला 'सलमानसोबत का ब्रेकअप केलं?' असा प्रश्न केला होता त्यावर ऐश्वर्याने उत्तर दिलं की, "सलमान खान दारू पिऊन धिंगाणा घालायचा. तसेच शिवीगाळ करायचा. सलमानने माझ्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले आहेत. यामुळे मी सलमान खानसोबत ब्रेकअप केलं.मी जेव्हा सलमानचे फोन उचलणे बंद केले तेव्हा चक्क त्याने मला मारहाण देखील केली. मला त्याच्यामुळे अनेक वेळा शारीरिक दुखापत झाली आहे. पण मी एक स्वाभिमानी स्त्री असल्यामुळे मला हे सर्व सहन झाले नाही आणि मी सलमान सोबत असलेले नातं तोडले." एका मिडिया मुलाखतीत मात्र सलमानने ऐश्वर्याने केलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या रायने 90चे दशक गाजवले आहे. तिच्या कातिल अदांवर चाहते नेहमी फिदा असतात. तिने अनेक हिट चित्रपट केले आहे. तसेच बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्यांसोबत तिने काम केलं आहे. ऐश्वर्या राय 2007 अभिषेक बच्चनसोबत लग्नबंधनात अडकली. ऐश्वर्या आणि अभिषेकने (Abhishek Bachchan) अनेक चित्रपट एकत्र केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.