Saam Tv
धनाशी निगडित मनाप्रमाणे घटना आज घडतील. कौटुंबिक स्वास्थ चांगले मिळेल. पण आपल्या बोलल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही ना याची विशेष खबरदारी घ्या.
आपल्या जवळच्या लोकांची काळजी घ्यावी लागेल. आज असाच दिवस स्वतःला आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये खर्च कराल.
गंभीर विषयांवर बोलणे शक्यतो टाळा, अन्यथा समोरचा तुम्हाला वाईट समजेल. त्यामुळे मनस्ताप वाढण्याचे आज योग आहेत.
जुने मित्र-मैत्रिणी भेटण्याचा आजचा दिवस आहे. जुन्या गोष्टींना उजाळा मिळेल. मनासारख्या घटना घडल्यामुळे एक वेगळी सकारात्मक भावना आणि वलय आज आजूबाजूला राहील.
कामासाठी प्रवास होतील. वेळ काढावा लागेल. समाजकार्य हातून घडेल. आपल्याला मोठेपणा मिळण्याचे ऐवजी आपल्याकडून मोठे काम कसे होईल याचा विचार करा.
इतरांकडून प्रेरणा घेऊन जोमाने कामाला लागलेला आहात. भाग्याचा कौल आपल्या बाजूने येईल. देवावरची श्रद्धा आणि विश्वासात आज वाढ होईल. विशेष विष्णू उपासना करावी.
अडचणींची सामना आज करावा लागेल. एक झाल्यानंतर दुसरी उभीच राहील. पण आपल्या बॅलन्स स्वभावामुळे गोष्टी सुकर कराल.
जोडीदारा बरोबरचा अबोला धरणे टाळा . मनामध्ये नसेल तरीही एकमेकांसाठी सुयोग्य गोष्टी कराल. कोर्टकचेरीच्या माध्यमातून यश मिळेल. व्यापार व्यवसायात प्रगती होईल.
शत्रु वाढतील पण आपल्याकडे कोणी टिकू शकणार नाही. अशावेळी योग्य निर्णय घ्या. दोलायमान मन मनस्थिती टाळा. कटकटी ना पायदळी ठेवून पुढे चला.
आपल्याकडून खूप वेळेला हव्या त्या पद्धतीने समोरच्याला मांडले जात नाही. पण आज मोकळेपणाने बोला आपल्या व्यक्तीवर असणारे प्रेम हे तुम्हाला आयुष्याचे नवीन इंद्रधनु देईल.
गृह सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. घरामध्ये काही बदल वाहन खरेदी अशा गोष्टी घडतील.
पराक्रमाच्या नवीन वाटा मिळतील. आजच्या दिवसात जे ठरवाल ते घडेलच.
NEXT: बगीचा सुंदर दिसण्यासाठी तुमच्या बागेत लावा ही 5 झाडे