Amy Jackson Got Engaged With Boyfriend Ed Westwick Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amy Jackson ने बॉयफ्रेंड Ed Westwick सोबत स्वित्झर्लंडमध्ये गुपचूप केला साखरपुडा, एंगेजमेंटचे फोटो व्हायरल

Amy Jackson Got Engaged With Boyfriend Ed Westwick: स्वित्झर्लंडमध्ये एड वेस्टविकने (Ed Westwick) एमी जॅकसनला (Amy Jackson) अंगठी घालत खास फिल्मी अंदाजमध्ये एंगेजमेंट केली आहे. त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Amy Jackson Engagement:

बॉलिवूड (Bollywood) आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्धी अभिनेत्री एमी जॅक्सन सध्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. एमीने लाँग टाइम बॉयफ्रेंड एड वेस्टविकसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे. स्वित्झर्लंडमध्ये एड वेस्टविकने (Ed Westwick) एमी जॅकसनला (Amy Jackson) अंगठी घालत खास फिल्मी अंदाजमध्ये एंगेजमेंट केली आहे. त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने स्वत: एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे.

एमी जॅक्सनने 2022 मध्ये 'गॉसिप गर्ल' फेम हॉलिवूड अभिनेता एड वेस्टविकसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. सोशल मीडियावर सक्रीय असणारी एमी आणि एड नेहमी एकमेकांप्रेती प्रेम व्यक्त करत असतात. त्याचसोबत त्याचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता या कपलने आपल्या आयुष्याच्या नवीन अध्यायाला सुरूवात केली आहे. नुकताच त्यांनी एंगेजमेंट केली आहे. सध्या त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत.

एड वेस्टविकने स्वित्झर्लंडच्या सुंदर बर्फाच्छादित व्हॅलीमध्ये त्याची लेडी लव्ह एमी जॅक्सनला अंगठी घालत एंगेजमेंट केली आहे. एडने स्वित्झर्लंडमधील पुलावर एका गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाईलमध्ये एमीला लग्नासाठी प्रपोज केला आणि तिच्या हाताच्या बोटामध्ये अंगठी घातली. हे पाहून अभिनेत्री खूपच आश्चर्यचकीत आणि भावुक झाली. एमीने देखील बॉयफ्रेंड एडचा लग्नाबाबतचा प्रपोजल क्षणाचाही विलंब न लावता स्वीकारला.

एमी जॅक्सनने 29 जानेवारीला आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये एमी जॅक्सन तिचा बॉयफ्रेंड एड वेस्टविकसोबत रोमँटिक झाल्याचे दिसत आहे. स्वित्झर्लंडच्या सुंदर व्हॅलीमध्ये एडने एमीला एंगेजमेंट रिंग घातली. एमीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये एड वेस्टविक एमी जॅक्सनसमोर गुडघ्यावर बसलेला आणि तिचा हात हातामध्ये धरलेला दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही कॅमेऱ्याकडे बघत पोझ देताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये हे कपल एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत आणि इतर काही लोकही दिसत आहेत. चौथ्या फोटमध्ये एमी आणि एड एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.

एमी जॅक्सनने एंगेजमेंटचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'हेल यस।' यासोबतच एक रिंग इमोजी देखील तिने कॅप्शनमध्ये पोस्ट केला आहे. एमी जॅक्सनने तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली असून चाहते देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अथिया शेट्टी, कियारा अडवाणी, ओरीसह इतर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी एमी आणि एड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एमीचा बॉयफ्रेंड एड हा हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि संगीतकार आहे. दरम्यान, एमी जॅक्सनने 'सिंह इंज ब्लिंग', 'एक दीवाना था', 'फ्रीकी अली', 'क्रॅक' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचसोबत ती साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT