बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय अडचणीत सापडला आहे.
मुंबई पोलिसांनी हिरे घोटाळ्याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.
फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि चेक बाऊन्स झाल्याच्या आरोपांवरून चौकशीत विवेक ओबेरॉयसह तीन आरोपींची नावे समोर आली आहेत.
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय कायम त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. मात्र आता विवेक ओबेरॉय चांगलाच अडचणीत सापडला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) क्युपिड डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित एका हिरे घोटाळ्याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. कंपनीचे संचालक निमेश पियुष मेहता उर्फ टोनी यांनी अनेक व्यक्तींवर सुमारे 34.75 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीच्या आरोपात विवेक ओबेरॉयचे नाव देखील सामील आहे. तक्रारीनुसार, पोलिसांनी सतीश दरियानानी, रिकी वासवानी आणि बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय या तीन व्यक्तींची फसवणुकीसंबंधित चौकशी सुरू केली आहे. तक्रारीनुसार, गुन्हा 2021 ते सप्टेंबर 2025 या काळात घडली. या काळात आरोपींनी अनेक पद्धतींचा वापर करून तक्रार करणाऱ्या व्यक्तीला फसवण्याचा कट रचला.
तक्रारीत म्हटल्यानुसार, सुरुवातीला आरोपींनी कमी प्रमाणात हिरे खरेदी केले आणि विश्वास मिळवण्यासाठी वेळेवर पैसे दिले. त्यानंतर दुबईतील 'सोलिटारियो डायमंड्स'च्या आयपीओमध्ये 25 टक्के भागभांडवल देण्याचे आश्वासन देऊन एका मोठ्या व्यावसायिक कराराचा प्रस्ताव ठेवला.मोठ्या प्रमाणात चांगल्या दर्जाचे आणि मोठ्या किंमतीचे हिरे मिळवल्यानंतर, आरोपींनी पोस्ट-डेटेड चेक (पीडीसी) दिला, परंतु नंतर त्यांचे पेमेंट थांबवले. ज्यामुळे चेक बाऊन्स झाला.
चौकशीदरम्यान, तक्रारदार कंपनीचे दुसरे संचालक मिलन शाह यांची बनावट सही केल्याचे देखील समोर आले. आरोपींनी फसवणूक करण्यासाठी बनावट कंपनी लोगो, लेबल्स आणि शिक्के तयार केले. एका अधिकाऱ्याने खुलासा केला की, आरोपींनी कुरिअरद्वारे हिऱ्यांच्या ऐवजी कमी दर्जाचे स्टोन पाठवले आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच मूळ हिरे परत केल्याचा खोटा दावा केला.ईओडब्ल्यूच्या मते, हे प्रकरण सध्या प्राथमिक तपासाच्या टप्प्यावर आहे, ज्यामध्ये कागदपत्रे आणि बँक व्यवहारांची बारकाईने तपासणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.