Vikrant Massey yandex
मनोरंजन बातम्या

Vikrant Massey: बॅालिवूडला सोडणारा अभिनेता विक्रांत मॅसीचं नेटवर्थ किती?

Vikrant Massey Net Worth: बॅालिवूड अभिनेता विक्रांत मॅसी याने कमी काळातच आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली. लहानमोठ्या भूमिका करत आज तो अनेक सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

द साबरमती रिपोर्ट आणि 12th फेल सारख्या सुपरहिट सिनेमाने बॅालिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता विक्रंत मॅसी याने आज सकाळी अभिनयातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली. आपल्या करिअरच्या शिखरावर असताना विक्रांतने येवढे मोठे पाऊल उचलत त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला.

विक्रांतने टिव्ही मालिकेपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याने ‘धरम वीर’, ‘बालिका वधू’, ‘कुबूल है’ आणि ‘बाबा ऐसा वर ढुंढो’ सारख्या मालिकांमध्ये लहानमोठं काम करत बॅालिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली. त्याने टिव्ही आणि बॅालिवूडमध्ये १७ वर्षे काम केली. एखाद्या कलाकाराचे नाव जेव्हा मोठे होते तेव्हा त्याच्या कमाईमध्ये देखील वाढ होते. सुपरहिट सिनेमानंतर विक्रांतच्या कमाईतही मोठी वाढ झाली. मुंबईत आलिशान घर ते आलिशान गाडी विक्रांत मॅसी लक्झरियस आयुष्य जगतो. चला तर जाणून घेऊया, विक्रांत मॅसीचे नेटवर्थ किती.

विक्रांत मॅसी नेटवर्थ

विक्रांतने अनेक वर्षे टिव्ही मालिकांमध्ये काम केलं. यानंतर त्याने सिनेमामध्ये अनेकवेळा साहाय्यक भूमिका केली. गेल्या काही वर्षांपासून तो सिनेमांमध्ये मुख्य भमिकेत दिसत आहे. त्यातच त्याच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली. लाइफस्टाइल आणि आशिया नेटच्या वृत्तानुसार, विक्रांत मॅसीची एकूण संपत्ती २० ते २६ कोटींच्या आसपास आहे.

मुंबई सारख्या शहरात त्याचे आलिशान घर आहे. या घराची किंमत १.१६ कोटी आहे. एका अहवालानुसार, तो एका ब्रँडच्या जाहिरतीसाठी सुमारे ५० लाख ते १ कोटी रुपये आकारतो. तर सिनेमांसाठी १ते २ कोटी साइनिंग रक्कम आकारतो. अशी माहिती आहे.

आलिशान कार

विक्रांतकडे कोटींची कार आहेत. त्याच्याकडे १ कोटीची मर्सिडिज बेंज जीएलएस आहे. याशिवाय ६० लाखांची वोल्वो आहे. विक्रांतला बाईक चालवायला आवडतं. त्याच्याकडे १२ लाखांची डुकाटी बाईक आहे.

विक्रांतचं कुटुंब

विक्रांतच्या कुटुंबात त्याचे आई वडील आणि त्याची बायको आणि भाऊ आहे. त्याचे वडील ईसाइ तर आई सिख आहे. आणि भाऊ मुस्लिम धर्माला मानतो. विक्रांतने हिंदू मुलीशी लग्न केले आहे. एका इंटरव्हयूमध्ये त्याने आपल्या कुटुंबाबत माहिती दिली. विक्रांतच्या बायकोचे नाव शीतल ठाकूर आहे. २०२२ साली हे दोघ लग्नबंधनात अडकले. त्यांना एक मुलगा आहे.

विक्रांतचे प्रोजेक्टस

विक्रांत मॅसी सध्या आपल्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'यार जिगरी' आणि 'आखों कि गुस्ताखिय़ा' हे दोन सिनेमे २०२५ मध्ये रिलीज होणार आहेत. त्याचबरोबर हसीना दिलरुबा ३ सुद्धा पुढच्या वर्षी सिनेनागृहात रिलीज होणार आहे.

Edited by : Priyanka Mundinkeri

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT