Vikrant Massey And Sheetal Thakur Blessed With A Baby Boy Instagram
मनोरंजन बातम्या

Vikrant Massey Blessed Baby Boy: '12th Fail' फेम विक्रम मेस्सीला पुत्ररत्न; पत्नीने दिला गोंडस मुलाला जन्म

Vikrant Massey And Sheetal Thakur News: विक्रांत मेसीच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्याने मुलगा झाल्याची बातमी सोशल मीडियावरून शेअर केली आहे.

Chetan Bodke

Vikrant Massey And Sheetal Thakur Blessed With A Baby Boy

'१२ वी फेल' चित्रपटामुळे अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अभिनेत्याच्या फॅन्सलिस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणारा विक्रांत मेस्सी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. विक्रांत मेसी नुकताच बाबा झाला आहे. त्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्याने मुलगा झाल्याची बातमी सोशल मीडियावरून शेअर केली असून त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. (Bollywood)

विक्रांत मेस्सी आणि शीतलने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत गोड बातमी दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याचा, त्याच्या पत्नीचा आणि चिमुकल्या बाळाच्या हाताचा फोटो आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, " 07-02-2024 तारखेला आमच्या घरी एका चिमुकल्याचं आगमन झाले आहे. आम्हाला मुलगा झाला आहे, हे सांगताना आम्हाला फार आनंद होतोय. " असं अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विक्रांतने मुलाची गोड बातमी चाहत्यांसह परिवाराकडून आणि अनेक सेलिब्रिटी मित्रांकडूनही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. (Bollywood Actor)

विक्रांतने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शितलच्या प्रेग्नेंसीबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. शितल आणि त्याच्या लवस्टोरीबाबत सांगायचे तर त्यांनी २०२२ मध्ये लग्न केले. सहसा विक्रांत मेस्सी आपल्या खासगी आयुष्याबद्दल तो चाहत्यांना काही सांगत नाही. त्याला सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील प्रायव्हेट स्पेस शेअर करायला आवडत नाही. (Bollywood News)

विक्रांत शेवटचा विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '१२ वी फेल'मध्ये दिसला होता. त्याच्या या चित्रपटातील अभिनयाचे प्रेक्षक जोरदार कौतुक करताना दिसत आहे. याच चित्रपटासाठी त्याला यंदाचा फिल्मफेयर पुरस्कारही मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर १२ वी फेलनं (12th fail movie) मोठी कमाई केली असून चाहत्यांसह सर्वांनीच त्याचे कौतुक केले. विक्रांत लवकरच 'फिर आयी हसीन दिलरुबा' आणि 'सेक्टर ३६' मध्ये दिसणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT