मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh ) मुख्यमंत्री मोहन यादव (CM Mohan Yadav) यांनी बुधवारी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. विकी कौशलचा 'छावा' (Chhaava ) चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी झालेल्या जाहीर सभेत मोहन यादव यांनी ही घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट देखील केली आहे. ज्यात त्यांनी 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री केल्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पोस्टमध्य लिहिलं की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्यावर आधारित 'छावा' हा हिंदी चित्रपट मी करमुक्त करण्याची घोषणा करतो.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर 'छावा' चित्रपट बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात अनेक यातना सहन केल्या आहेत. देशासाठी आपले प्राण दिले. इतका छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा सांगणारा इतका उत्कृष्ट सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मी जाहीर घोषणा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा परिचय व्हावा आणि त्यांचे कार्य सर्वांना कळावे म्हणून हा निर्णय घेतला आहे.
विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता विकी कौशल (vicky Kaushal) आणि महाराणी येसूबाईची भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळत आहेत. चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे.
'छावा'ने 6 दिवसात तब्बल 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'छावा' चित्रपट तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. छावा' चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 5 कोटी कमावले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.