Maharashtra Politics: मंत्रिमंडळातला फितूर कोण? मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सज्जड दम

CM Fadnavis On Cabinet Meeting: महायुतीत धुसफूस सुरु असतानाच आता मंत्रिमंडळातील फितूरीचा विषय ऐरणीवर आलाय. मंत्रालयात नेमकं काय घडलं? मंत्रालयातून कुणी फितुरी केली आणि फडणवीसांच्या रागाचा पारा का चढला? पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट.
CM Fadnavis On Cabinet Meeting
CM Fadnavis On Cabinet Saam Tv
Published On

मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीची लगबग सुरु होती. मात्र बैठकीपुर्वीच मंत्रिमंडळाचा अजेंडा फुटला आणि राज्यात डान्स बार सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकली. त्यामुळे फडणवीसांच्या रागाचा पाराच चढला. त्यानंतर फडणवीसांनी आपल्याच मंत्रिमंडळातील फितूर मंत्र्यांना सज्जड दम दिलाय.

CM Fadnavis On Cabinet Meeting
Cabinet Meeting Decision : फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत ३ महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

तर ठाकरे मुख्यमंत्री असतानाही मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक केला जात होता. तुम्ही ज्यांना सन्मानाची पदं दिले तेच लोकं फितुरी करत असल्याचा दावा राऊतांनी केलाय. तर मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातील फितूर शोधण्यासाठी आवश्यकता असेल तर विरोधक म्हणून आम्ही नावं देऊ, असं विधान वडेट्टीवारांनी केलंय.

CM Fadnavis On Cabinet Meeting
Sanjay Raut: सरपंच देशमुख हत्याप्रकरणात धसांची डील पक्की; संजय राऊतांचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

एकीकडे शिंदे-फडणवीसांमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याची चर्चा आहे. त्यातच आता कॅबिनेट मीटिंगपुर्वीच अजेंडा लीक होत असल्याने फडणवीसांनी आपल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिलाय. त्यामुळे मंत्री गोपनियतेची शपथ पाळून मंत्रिमंडळाचा अजेंडा गुप्त ठेवणार की कुरघोडीच्या राजकारणात जाणीवपूर्वक बातम्या बाहेर येत राहणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

CM Fadnavis On Cabinet Meeting
Devendra Fadnavis: मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीय माहिती बाहेर फोडल्यास कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांचा 'फितुरांना' इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com