Baby John  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Baby John Collection : 'बेबी जॉन'च्या कलेक्शनमध्ये तिसऱ्याच दिवशी घसरण, कमाईचा आकडा किती?

Baby John Box Office Collection Day 3 : ख्रिसमसच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा 'बेबी जॉन' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटने तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूचा 'हँडसम हंक' वरुण धवनचा (Varun Dhawan ) 'बेबी जॉन' (Baby John) बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. या चित्रपटात वरुणसोबत कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी हे स्टार देखील पाहायला मिळत आहे. 'बेबी जॉन' हा ॲक्शन चित्रपट आहे. 'बेबी जॉन' चित्रपट 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या रिलीज पहिल्या दिवसापासून चित्रपट निराशाजनक कामगिरी करत आहे.

'बेबी जॉन' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

'बेबी जॉन' बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वरुण धवनच्या 'बेबी जॉन' चित्रपटाने पहिल्या दिवशी 12.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 4.5 कोटी रुपये कमावले. दिवसेंदिवस चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण होत आहे. 'बेबी जॉन' ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 3.65 रुपये कमावले आहेत. चित्रपटाने एकूण तीन दिवसांत भारतात 19.65 कोटींची कमाई केली आहे.

वरुण धवनच्या 'बेबी जॉन' चित्रपटात बॉलिवूडचा भाईजान 'सलमान खान'ची झलक पाहायला मिळाली आहे. वरुण धवनच्या 'बेबी जॉन' चित्रपटात सलमान खानचा कॅमिओ आहे. 'बेबी जॉन' चित्रपटाचे निर्माते अ‍ॅटली आहेत. सलमान खान अ‍ॅटलीच्या आगामी चित्रपट 'ए६'मध्ये झळकणार आहे. तो चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. भाईजानला चित्रपटात मास हिरो म्हणून सादर केले जाईल. सलमान खानचा चित्रपटात कॅमिओ पाहून चाहते खूप खुश आहेत.

वरुण धवनचा 'बेबी जॉन' चित्रपट बॉक्स ऑफिसवर वीकेंडला किती कमाई करतो, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 'बेबी जॉन' हा चित्रपट साऊथच्या 'थेरी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. थेरीमध्ये सुपरस्टार विजय मुख्य भूमिकेत होती. 'थेरी' हा चित्रपटीने बॉक्स ऑफिसवर जादू केली. मात्र हिच जादू वरुण धवनचा 'बेबी जॉन'चित्रपट करण्यास कमी पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

Maharashtra Live News Update: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

SCROLL FOR NEXT