Varun Dhawan : तुम्ही या देशाचे हनुमान... ; वरुण धवनच्या प्रश्नावर अमित शहांचं भन्नाट उत्तर

Varun Dhawan : वरुण धवन अनेकदा त्याच्या विनोदी उत्तरांमुळे चर्चेत राहतो, परंतु यावेळी तो त्याच्या अमित शहांना विचारलेल्या एका प्रश्नामुळे प्रिसिध्दीझोतात आहे.
तुम्ही या देशाचे हनुमान...  ; वरून धवनच्या प्रश्नावर अमित शहाचं भन्नाट उत्तर
Varun Dhawan and amit shahSaam Tv
Published On

Varun Dhawan : बॉलीवूड अभिनेता वरुण धवन सतत चर्चेत असतो. वरुण अनेकदा मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसतो, पण त्याला पहिल्यांदाच प्रेक्षक बनण्याची संधी मिळाली. वरुण धवनने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि समोरच्या मंचावर उपस्थित देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना राम आणि रावणातील सर्वात मोठा फरक कोणता असा प्रश्न विचारला. यासोबतच वरुण धवनने त्यांचे भरभरून कौतुक केले ज्यामुळे स्टेजवर बसलेले गृहमंत्री हसले.

अमित शाह एका कार्यक्रमानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांना ऐकण्यासाठी वरुण धवनही तिथे उपस्थित होता. गृहमंत्र्यांच्या बोलण्याने मंत्रमुग्ध झालेला अभिनेता त्यांना प्रश्न विचारण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. अमित शाह यांच्या बोलण्याने प्रभावित होऊन वरुण धवनने त्यांना राम आणि रावणातील सर्वात मोठा फरक कोणता असा प्रश्न विचारला अभिनेत्याच्या प्रश्नांना उत्तरे देताना अमित शाह यांनी त्याला धर्म, अनीति आणि अहंकार याविषयी माहिती दिली.

तुम्ही या देशाचे हनुमान...  ; वरून धवनच्या प्रश्नावर अमित शहाचं भन्नाट उत्तर
Mukesh Khanna : मुकेश खन्नाने 'शक्तिमान'चे हक्क देण्यास दिला नकार ; म्हणाले 'तुम्हाला बनवायचे असेल तर...'

रावणाने धर्म बदलण्याचा प्रयत्न केला होता...

अमित शहा म्हणाले, 'काही लोकांचे हित धर्मानुसार असते, ते धर्मानुसार आपली कृती ठरवतात. त्याचबरोबर काही लोक त्यांच्या आवडीनुसार धर्म बदलतात. रामाने आपले जीवन धर्माच्या व्याख्येनुसार जगले. त्याच वेळी रावणाने स्वतःच्या व्याख्येनुसार धर्म बदलण्याचा प्रयत्न केला. हा राम आणि रावणातला सर्वात मोठा फरक होता.

तुम्ही या देशाचे हनुमान...  ; वरून धवनच्या प्रश्नावर अमित शहाचं भन्नाट उत्तर
Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझवर चढला 'पुष्पा भाऊ'चा रंग; कॉन्सर्टमध्ये म्हणाला, 'जब साला नहीं झुकेगा...

वरुणच्या बोलण्यावर अमित शहा हसले

गृहमंत्र्यांच्या बोलण्याने खूश होऊन वरुण धवनने त्यांना देशाचा हनुमान संबोधले जे रात्रदिवस निस्वार्थपणे देशाची सेवा करतात. वरून म्हणाला, 'एखादा कलाकार पाठ केलेली वाक्य देखील इतक्या स्पष्टतेने बोलू शकत नाही. पण तीच व्यक्ती असे विचार मांडू शकते जे मनापासून या विचारांचे पालन करतात. म्हणून माझ्यामते तुम्ही या देशाचे हनुमान आहात. असे मत वरुण धवनने मांडले त्याच्या अशा बोलण्यामुळे अमित शहा हसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com