Tusshar Kapoor Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tusshar Kapoor: तुषार कपूर OTT प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करण्यासाठी सज्ज, 'डंक'मधून येतोय भेटीला

Dunk Movie: या चित्रपटामध्ये तुषार कपूर अजिंक्य नावाचे पात्र साकारणार आहे. तो वकिलाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तुषारचे चाहते आनंदी झाले आहेत.

Priya More

Tusshar Kapoor Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता तुषार कपूर (Tushar Kapoor) बॉलिवूडनंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो ओटीटीवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेरणा अरोराच्या 'डंक - वन्स बिटन ट्वीस शाय' या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये तुषार कपूर अजिंक्य नावाचे पात्र साकारणार आहे. तो वकिलाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तुषारचे चाहते आनंदी झाले आहेत.

डंक चित्रपटाबद्दल प्रेरणा अरोराने सांगितले की, 'डंक शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणारा चित्रपट ठरणार आहे. एक समाज म्हणून आपण जमीन बळकावण्याच्या या धोक्याविरुद्ध एकजुटीने उभे राहिले पाहिजे. गुन्हेगारांना जबाबदार धरले पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांना सशक्त आणि संरक्षण देणाऱ्या धोरणांचा पुरस्कार केला पाहिजे.

उत्तम कथानक आणि सामाजिक संदेश असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रेरणा अरोराने 'रुस्तम', 'टॉयलेट - एक प्रेम कथा', राष्ट्रीय विजेते 'पॅड मॅन', 'परमानु: द स्टोरी ऑफ पोखरण' यासारखे यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रेरणा अरोराच्या डंक चित्रपटामध्ये तुषार कपूर व्यतिरिक्त निधी अग्रवाल, शिविन नारंग, सुचित्रा कृष्णमूर्ती हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.'डंक' व्यतिरिक्त प्रेरणा अरोरा तेलुगू चित्रपट 'हीरो हिरोइन'ची निर्मिती करत आहे. या चित्रपटामध्ये दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत आहे.

दरम्यान, स्टारकिड असताना देखील तुषार कपूरला बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी खूप वेळ लागला. २००६ मध्ये रिलीज झालेल्या 'गोलमाल' चित्रपटाच्या माध्यमातून तुषार कपूर लाइमलाइटमध्ये आला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. तुषार कपूरने 'गोलमाल २', 'खाकी' आणि 'शूट आऊट एट वडाला' या चित्रपटामध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. आता तो डंकमध्ये दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT