Tiger Shroff and Amitabh Bachchan image Saam tv
मनोरंजन बातम्या

टायगर श्रॉफ-क्रिती सेननच्या 'गणपत'मध्ये अमिताभ बच्चनची दमदार एन्ट्री

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्याचा आगामी चित्रपट 'गणपत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेननही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री क्रिती सेननचा (Kriti Sanon) आगामी चित्रपट 'गणपत' (Ganapath) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात टायगरसोबत क्रितीही दमदार अॅक्शन करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे देखील या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

माहितीनुसार, टायगरच्या 'गणपत' या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांची एन्ट्री झाली आहे. अमिताभ बच्चन 'गणपत'मध्ये टायगरच्या मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा काही भाग मे महिन्यात मुंबईत शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनयासोबतच अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाला आपला आवाजही दिला आहे.

ही अटकळ खरी असल्यास, या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. 'गणपत' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत टायगरचे वडील अभिनेता जॅकी श्रॉफही पाहुणे कलाकार म्हणून या चित्रपटात दिसणार आहेत. यापूर्वी ही पिता-पुत्राची जोडी 'बागी ३' मध्ये एकत्र दिसली होती.

टायगर 'गणपत' या चित्रपटासाठी बॉक्सिंग शिकला आहे. या चित्रपटात टायगर मुंबईच्या बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट बाप आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. दिग्दर्शक विकास बहल या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, जॅकी भगनानीच्या पूजा एंटरटेन्मेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २३ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून आता हा चित्रपट पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यावर असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Safety Tips: किचनमध्ये गॅस सिलिंडर फ्रिजच्या जवळ का ठेवू नये? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: गोकुळ दूधसंघाच्या प्रकरणात सतेज पाटील यांना न्यायालयाकडून न्यायची अपेक्षा

EPFO Update : मोठी बातमी! EPF खात्यातील चुकीचं नाव किंवा जन्मतारीख घरबसल्या बदला; फक्त ५ सोप्या स्टेप्स

Palak Paneer Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चविष्ट पालक पनीर, वाचा सोपी रेसिपी

मुंबई पळून जाताना आमदाराला अटक, खंडणीच्या गुन्ह्यात मोठी कारवाई, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT