Shreyas Talpade In Chandu Champion Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade News : कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये अभिनेता श्रेयस तळपदेची वर्णी, पोस्ट शेअर करत व्यक्त केली मनातली भावना

Shreyas Talpade In Chandu Champion : अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटामध्ये अनेक मराठी सेलिब्रिटीही प्रमुख भूमिकेत आहे. हेमांगी कवीसोबत अभिनेता श्रेयस तळपदेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Chetan Bodke

कार्तिक आर्यनच्या 'चंदु चॅम्पियन'ची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ह्या चित्रपटात भारताला पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांचे कथानक आहे. मुरलीकांत पेटकर यांचे पात्र चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन साकारत आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काही मराठी सेलिब्रिटीही आहेत. हेमांगी कवीसोबत चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदेही दिसणार आहे. मुरलीकांत पेटकर यांच्या बायोपिकमध्ये श्रेयसने पोलिस इन्स्पेक्टरची भुमिका साकारली आहे.

श्रेयस तळपदेने इन्स्टाग्रामवर रिल शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्याची चित्रपटामध्ये फार छोटी भूमिका आहे. श्रेयस तळपदेने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय की, "नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मुरलीकांत पेठकर यांच्या 'चंदु चॅम्पियन' या बायोपिकमध्ये मला पोलिस इन्स्पेक्टर सचिन कांबळेंची भूमिका साकारण्याचा मोठा मान मिळाला आहे. ज्यावेळी कबीर भाईंनी (दिग्दर्शक कबीर खान) मला चित्रपटाचं कथानक सांगितलं, तेव्हा सुरुवातीला मला आश्चर्य वाटलं की, आपल्या महाराष्ट्रातील अनेकांना या खऱ्या आयुष्यातील चॅम्पियनविषयी माहिती नाही. मला पोलिस इन्स्पेक्टर सचिन कांबळे यांची भूमिका दिल्याबद्दल दिग्दर्शक कबीर भाईंचे मनापासून आभार."

"माझा या भूमिकेसाठी विचार केल्याबद्दल कास्टिंग डायरेक्टर यांचेही मनापासून आभार. अनेकदा माझ्या मनात विचार यायचं की, तू माझा या भूमिकेसाठी का विचार केला असेल ? पण, तू योग्य निर्णय घेतलास. त्यासाठी तुझे आभार आय लव्ह यू डार्लिंग. कार्तिक आर्यनविषयी सांगायचं तर, तू खरा चॅम्पियन आहेस. तू खूप खरेपणाने ‘चंदू’ची भूमिका साकारली आहेस. बायोपिकमध्ये काम करणं हे खूप कठीण असतं. बायोपिकमध्ये काम करताना त्या पात्राप्रमाणे काम करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. तू चित्रपटामध्ये जीव ओतून काम केलं आहेस. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट आणि तुझे येणारे सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर ठरोत हीच शुभेच्छा! ‘चंदू चॅम्पियन’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. नक्की पाहा…ही सुंदर कलाकृती पाहणं चुकवू नका" अशी पोस्ट श्रेयस तळपदेने शेअर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

Maharashtra Live News Update: रत्नागिरीच्या लोटे midc मध्ये विनती ऑरगॅनिक कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT