Shahid Kapoor New Film Announcement: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण यावेळी तो त्याच्या वाढदिवसामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. २५ फेब्रुवारीला अर्थात आज शाहिद कपूर आपला ४२ वा वाढदिवस साजरा करीत आहे. सध्या शाहिदची एक मुलाखत सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. त्यात त्याने त्याच्याकडे असलेल्या चित्रपटांवर भाष्य केले आहे.
'विवाह', 'जब वी मेट', 'हैदर', 'उडता पंजाब', 'आर राजकुमार', 'पद्मावत', 'कबीर सिंग' यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या शाहिदने अनेकदा स्वत:ला सिद्ध केले आहे. सध्या त्याने 'फर्जी' चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण केले आहे. शाहिद कपूरने राज आणि डीकेच्या 'फर्जी' या वेब सीरिजद्वारे डिजिटल पदार्पण केले आहे.
मुलाखतीत शाहिद म्हणतो, " मी जेव्हाही नवी कलाकृती करतो त्यावेळी त्याविषयी दिग्दर्शकासोबत सर्वाधिक वेळ चर्चा करतो. हळूहळू पात्रावर बराच वेळ घालवावा लागतो, मग आपली भूमिका कशी आहे हे कळते. मी प्रत्येक पात्रासाठी अनेक महिने देतो. देहबोलीपासून ते बोलण्यापर्यंत सगळंच यातून शिकायला मिळतं. जेव्हा तुम्ही परिवर्तन करता तेव्हा लोक बोलतात की तुम्ही 20 किलो वजन वाढवले किंवा कमी केले. पण याशिवाय व्यक्तिरेखेचं निरीक्षण करणंही खूप महत्त्वाचं असतं. मला थेट सेटवर जायला आवडत नाही. माझ्या भूमिकेसाठी व्यवस्थित वेळ देत भूमिका करायला आवडते."
शाहिद कपूर आणि करीना कपूरचा 'जब वी मेट' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. अशा चित्रपटांमध्ये तो कधी दिसणार आहे, यावर त्याने लवकरच असा नवीन चित्रपट आणणार असल्याचे सांगितले. तो म्हणतो,मी 'जब वी मेट' सारखा चित्रपट मी पुन्हा एकदा घेऊन येत आहे. पण यावेळी करीनासेबतच नाही तर क्रिती सेननसोबत हा चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना पुढच्या वर्षी पाहता येणार आहे.
शाहिद कपूरचा वाढदिवस २५ फेब्रुवारीला अर्थात आज. त्याच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही विशेष प्लॅन करत नाही. संधी मिळाल्यास फक्त कुटुंबासोबत काही क्षण घालवायला फार आवडतात. यावेळीही त्याचे कोणतेही नियोजन नाही. फक्त मुलांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.