shah rukh khan visit tirupati sri venkateswara swamy temple  Saam tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan At Tirupati: 'जवान'च्या यशासाठी 'किंग खान' पोहचला तिरुपतीला, मुलगी सुहानासोबत घेतलं व्यंकटेश स्वामींचं दर्शन; VIDEO आला समोर

Shah Rukh Khan Visit Sri Venkateswara Swamy Temple: शाहरुख खानने मुलगी सुहानासोबत तिरुपती येथील श्री. व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

Priya More

Jawan Movie: बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Bollywood Actor Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान (Jawan Movie) थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढतच चालली आहे. अशामध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख खान तिरुपतीला पोहचला आहे. शाहरुख खानने मुलगी सुहानासोबत तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता शाहरुख खान आज सकाळी तिरुपती येथे दाखल झाला. या ठिकाणी त्याने आपली मुलगी सुहाना खान आणि अभिनेत्री नयनतारासोबत तिरुपती येथील श्री. व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शाहरुख खानने मंदिरामध्ये माथा टेकवत पूजा देखील केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी शाहरुखने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि लुंगी असा पारंपारिक पोशाख परिधान केला होता. यावेळी शाहरुख खानला अचानक मंदिरात पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. शाहरुखला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याचसोबत मंदिर परिसरामध्ये त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठीचा मोह अनेकांना आवरता आला नाही.

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. अॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेला हा हाय-ऑक्टेन अॅक्शन चित्रपट आहे. जवान चित्रपट ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाईचा नवा विक्रम रचला होता. आता जवान देखील हे सर्व रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज झाला आहे. महत्वाचे म्हणजे जवानच्या आगाऊ बुकिंगला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी रात्रीपर्यंत 'जवान'च्या ५.७७ लाखांहून अधिक तिकिटांचे आगाऊ बुकिंग झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

Mumbai Traffic : BKC मधील प्रवास महागणार! ५० मिनिटांत बाहेर न पडल्यास ‘कंजेशन फी’ आकारली जाणार

Mumbai: भारताच्या स्टार क्रिकेटपटूला अंडरवर्ल्डकडून धमकी, ५ कोटींच्या खंडणीची मागणी

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

SCROLL FOR NEXT