aryan khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aryan Khan: ड्रग्ज प्रकरणानंतर आर्यनच्या आयुष्यात बदल, 'लाईफस्टाईल'मुळे वेधले सर्वांचेच लक्ष

ड्रग्ज प्रकरणानंतर आर्यनच्या आयुष्यात या गोष्टींमुळे खूपच बदल झाले आहे.

Chetan Bodke

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या वर्षी कार्डिलिया ड्रग्स प्रकरणामुळे कमालीचा चर्चेत होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. कार्डिलीया ड्रग्स प्रकरणामुळे त्याच्या व्यावसायिक जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. जवळपास तीन आठवडे त्याने तुरुंगात शिक्षा भोगली होती.चला तर जाणून घेऊयात त्याच्या आयुष्यातील बदल

अरबाज मर्चंटशी मैत्री

त्या दोघांनाही काही जामिन अटींप्रमाणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एकमेकांसोबत संपर्क साधायचे नाही, असे सांगितले होते. जरी ही ते चांगले मित्र असले तरी या प्रकरणामुळे त्यांना एकमेकांपासून दूर रहावे लागले.

मीडियाच्या गऱ्हाळ्यापासून दूर

आर्यन स्टार किड असल्यामुळे नेहमीच मीडियाच्या गऱ्हाळ्यात तो खेळत असायचा. मात्र जामिनाच्या अटींनुसार त्याला मीडियापासून पूर्णपणे दूर राहण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या निर्णयानुसार आर्यन खानला मीडियासमोर कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश दिले होते.

परदेशात जाऊ शकत नाही

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत होता. मात्र, त्याला कोर्टात त्याच्या विरुद्ध खटला सुरु असल्याने मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश दिले होते. त्याचा पासपोर्टही एनडीपीएस कोर्टाकडे सोपवण्यात आला होता.

बॉडीगार्ड आणि लाइफस्टाइल

गेल्या काही दिवसांपुर्वी शाहरुख लवकरच त्याच्यासाठी नवीन बॉडीगार्ड नियुक्त करणार आहे, अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरत होत्या. सोबतच त्याला तणावापासून दुर ठेवण्यासाठी त्याला काही काळ अलिबागच्या फार्महाऊसवर पाठवण्याची ही चर्चा होत होती. सोबतच त्याच्या खासगी आयुष्यातही आई गौरी खान बदल करण्याची शक्यता वर्तवली जात होती.

ब्रॅंडेड आरोपी

आर्यन खानला जामिन मिळाल्यानंतर त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. ड्रग्ज प्रकरणानंतर त्याला सोशल मीडियावर'ब्रॅंडेड आरोपी'चा टॅग देत ट्रोल केले होते.

आर्यन आणि सोशल मीडिया

शाहरुख खानचा मुलगा म्हणून नेहमीच आर्यन खानला प्रसिद्धी मिळाली आहे. आर्यन बॉलिवूडमध्ये येणार का अशीही चर्चा बऱ्याचदा झाली होती. दरम्यान त्याच्यावर झालेल्या ड्रग्ज केस प्रकरणानंतर आर्यन कुठेच दिसत नव्हता. मात्र आर्यन केसमधून बाहेर पडल्यानंतर भविष्याचा विचारात मग्न होता. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या बॉलिवूड डेब्युबद्दल चर्चा रंगत होत्या. पण त्याने त्यावेळी मी चित्रपटात अभिनेता म्हणून नाही तर वेगळ्या भूमिकेतून दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT