Shah Rukh Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: IPL ची मॅच पाहताना सिगारेट ओढताना दिसला शाहरुख खान, VIDEO होतोय व्हायरल

KKR Vs Sunrisers Hyderabad: आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टेडियमवर आला होता. यावेळी शाहरुख खान सिगारेट ओढताना दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Priya More

Shah Rukh Khan Video:

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएलच्या या सीझनची विजयाने सुरुवात केली. शनिवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव करण्यात कोलकाता नाईट रायडर्सला यश मिळाले. यावेळी आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टेडियमवर आला होता. यावेळी शाहरुख खान सिगारेट ओढताना दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यादरम्यानचा शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी शाहरुख खानला पाहून त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शाहरुख खान व्हीआयपी बॉक्समधून सामना पाहत आहे. यावेळी सामना पाहताना तो सिगारेट ओढताना दिसत आहे. शाहरुख खानला अशाप्रकारे स्मोकिंग करताना पाहून क्रिकेटप्रेमींनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.

सामना संपल्यानंतर केकेआरचा मालक शाहरुख खानने आपल्या टीमच्या सर्व खेळाडूंची भेट घेत त्यांचे कौतुक केले. खेळाडूंशिवाय ग्राउंड स्टाफ सदस्यांसोबतही त्याने फोटो काढले. अशामध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याच्या स्मोकिंग करतानाचा व्हिडिओ त्याच्या अडचणी वाढवू शकतो. स्टेडियमकडून शाहरुख खानविरोधात काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

क्रिकेट स्टेडियममध्ये शाहरुख खानबाबत वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शाहरु खानने ग्राऊंड स्टाफशी वाद घातला होता. या प्रकरणी त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणाने बरेच लक्ष वेधले होते. परंतू ईडन गार्डन्सवरील त्याच्या स्मोकिंगच्या घटनेवर बंगाल क्रिकेट असोसिएशन काय कारवाई करेल याबद्दल सध्या कोणतेही अपडेट नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT