Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: 'पठान'च्या वादात शाहरुख होतोय ट्रोल पण, आंतरराष्ट्रीय मासिकेत गाजवतोय वर्चस्व...

एका आंतरराष्ट्रीय मासिकाने ५० दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींची यादी जाहीर केली असून त्यात एकमेव भारतीय कलाकाराचं नाव आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. तब्बल चार वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. सध्या नेटकऱ्यांनी शाहरुखच्या चित्रपटाला बॉयकॉट केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनिला बऱ्याच जणांनी थेट विरोध दर्शवला आहे.

चित्रपटाच्या वादात दिवसागणिक वाढच होत चालली आहे. अशातच एका आंतरराष्ट्रीय मासिकाने ५० दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे, आणि त्यात एकमेव भारतीय कलाकाराचं नाव आहे तो म्हणजे शाहरुख खान. 'एम्पायर मॅगझिन' ने नुकतीच ही यादी जाहीर केली आहे.

सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या यादीत केवळ एकाच भारतीय कलाकाराच्या नावाचा यात समावेश आहे. शाहरुखच्या नावाचा यात समावेश झालेला पाहून भारतीयांना कमालीचा आनंद गगनात मावेनासा झाला हे नक्की. सध्या सोशल मीडियावर त्याच्यावर चांगलाच कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘एंपायर मॅगजीन’च्या या यादीत टॉम क्रुज, अल पचीनो, टॉम हँक्स, जॅक निकोलसन, लियोनार्डो दीकॅप्रिओ, मॉर्गन फ्रीमन, गॅरी ओल्डमन अशा दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. या दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत भारताचं नेतृत्व करणाऱ्या शाहरुख खानचं नाव अभिमानास्पद आहे. या मासिकेत शाहरुखच्या ‘कूछ कुछ होता है’, ‘देवदास’ पासून ‘स्वदेस’ सारख्या चित्रपटांमधील भूमिकेची प्रशंसा केली आहे.

शाहरूख त्याच्या चाहत्यांसाठी येत्या आगामी वर्षात मनोरंजनासाठी एक नाही तीन चित्रपट घेऊन येत आहे. त्यामुळे त्याचे चाहते बरेच उत्साहित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT