Vivek Agnihotri: काश्मिर फाईल्सला 'कचरा' म्हणणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकांना विवेक अग्निहोत्रींचे प्रत्युत्तर...

सध्या हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चेचे कारण म्हणजे, लेखक व दिग्दर्शक सईद अख्तर मिश्रा यांनी केलेल्या एका विधानावरून.
The Kashmir Files
The Kashmir FilesSaam Tv
Published On

Vivek Agnihotri: 2022 या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे, 'द काश्मीर फाईल्स'. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला होता. सध्या हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चेचे कारण म्हणजे, लेखक व दिग्दर्शक सईद अख्तर मिश्रा यांनी केलेल्या एका विधानावरून.

The Kashmir Files
Jacqueline Fernandez: मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी कायम; कोर्टात नेमकं काय घडलं?

पटकथा लेखक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अमूल्य योगदान दिले आहे. 'नसीम' आणि 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता हैं' हे चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहिले. त्याचबरोबर ‘नुक्कड’ व ‘इंतजार’ सारख्या मालिकेंचेही त्यांनी दिग्दर्शन केले. पण सध्या सईद ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबत केलेल्या विधानामुळे चर्चेत आहेत.

The Kashmir Files
Sohail khan: पहिल्याच भेटीत सोहेल पडला फॅशन डिझायनरच्या प्रेमात, हटक्या पद्धतींने केले लग्न

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटावर बरेच टीकेचे बाण सोडले आहे. चित्रपटाविषयी सईद म्हणतात, 'माझ्यासाठी 'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट म्हणजे कचरा आहे. पण कश्मिरी पंडितांच्या असलेल्या समस्या म्हणजे कचरा आहे का? तर असं नाही. त्यांच्या खरंच त्या समस्या आहेत.'

The Kashmir Files
Happy Birthday Taimur: तैमूरला लाडक्या बहिणीकडून गिफ्ट, गिफ्ट पाहता 'आनंद गगनात मावेना'

'पण हे फक्त कश्मिरी हिंदूंनाच सहन करावे लागते का? नाही हे तिथल्या कश्मिरी मुस्लिमांनाही सहन करावे लागते. गुप्तचर संस्था, राष्ट्रीय हित संबंध असलेले राष्ट्र आणि सीमेपलीकडून पगार घेणारे लोकं, जे सतत गोंधळ निर्माण करत आहेत, या सगळ्यांच्या षडयंत्रात अडकले आहेत. मुद्दा बाजू घेण्याचा नाही. माणूस व्हा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.'

The Kashmir Files
Kuttey Trailer: 'शिकार बनो या शिकार करो...' अर्जुन कपूरच्या 'कुत्ते' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सईद यांच्या या वक्तव्यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपले उत्तर दिले आहे. अग्निहोत्री यांनी उत्तर ट्विटच्या माध्यमातून दिले असून ते ट्विटमध्ये म्हणतात, “मी म्हणालो मिर्झा साहेबांना सलाम. ‘द दिल्ली फाइल्स’नंतर पुन्हा भेटूच. २०२४.” ट्विट शेअर करताना विवेक अग्निहोत्रींनी सईद मिर्झा यांच्या वक्तव्याचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com