Salman Khan 
मनोरंजन बातम्या

Salman Khan : भाईजानने पार्टीत गायलं स्वतः चं २६ वर्ष जुनं गाणं; जामनगरमधील 'तो' VIDEO व्हायरल

Salman Khan Viral Video: सलमान खानचा एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात तो गाणे गाताना पाहायला मिळत आहे. सलमान खानने कोणते गाणे गायले जाणून घ्या.

Shreya Maskar

नुकताच 27 डिसेंबरला भाईजान सलमान खानचा (Salman Khan) वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच्या वाढदिवसानिमित्त अंबानी कुटुंबीयांनी (Ambani Family) जामनगरमध्ये मोठी पार्टी आयोजित केली होती. आता सलमान खान 59 वर्षांचा झाला आहे. वाढदिवसानंतर सलमान खानने जामनगर (Jamnagar) येथे झालेल्या रिलायन्स रिफायनरीच्या २५ व्या वर्धापन दिनाला उपस्थिती लावली.

भाईजानचा एक जामनगरमधील व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओ सलमान खान 26 वर्ष जुने सुपरहिट गाणे गाताना दिसत आहे. त्याने 'ओ ओ जाने जाना' (O Oh Jaane Jaana) जबरदस्त परफॉर्मन्स केला. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. सलमान कार्यक्रमात सर्व अंबानी कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधतो.

नीता अंबानींची आई सलमान खानने गाणे गायल्यावर त्याला मिठी मारताना दिसत आहे. सलमान खान आणि अनंत अंबानी दोघे चांगले मित्र आहेत. सलमान खानच्या वाढदिवसाला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. तसेच सलमान खानचे कुटुंबही उपस्थित होते. भाईजानने सर्वांसोबत मिळून वाढदिवसाचा भव्य केक कापला.

सलमान खान सध्या 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेला पाहायला मिळत आहे. तसेच तो 'बिग बॉस 18' चे होस्टिंग देखील करत आहे. 'सिकंदर'चित्रपट नवीन वर्षात 2025 च्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते सलमानच्या नवीन चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. तर जानेवारी महिन्यात 'बिग बॉस 18' फिनाले पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT