Sikandar Release Date  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sikandar Release Date : सलमाननं घेतली मोठी रिस्क, 'सिकंदर' रविवारी रिलीज होणार

Salman Khan Sikandar Movie Release Date Announced: बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'सिकंदर'ची मोठी अपडेट समोर आली आहे. 'सिकंदर'च्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा अभिनेता भाईजान (Salman Khan ) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर'मुळे चांगला चर्चेत आहे. नुकतीच 'सिकंदर'बद्दल (Sikandar Release Date) मोठी अपडेट समोर आली आहे. 'सिकंदर'च्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. 'सिकंदर'च्या ट्रेलर आणि चित्रपटातील गाण्यांमुळे प्रेक्षकांची चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'सिकंदर'च्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रिलीज डेटमध्ये बदल सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना सांगितले आहेत.

'सिकंदर' कधी रिलीज होणार?

सलमान खानच्या 'सिकंदर'चे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट आधी 28 मार्चला शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता 'सिकंदर'च्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. 'सिकंदर' चित्रपट आता 28 मार्चला नाही तर 30 मार्च रविवारी रिलीज होणार आहे. सलमान खानने खास पोस्टर शेअर करून रिलीज डेटची माहिती दिली आहे. 30 मार्चला महाराष्ट्रीयन सण गुढीपाडवा देखील आहे. तर ईद 31 मार्चला असणार आहे.

सलमानने घेतली रिस्क

'सिकंदर' रविवारी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार की पहिल्याच दिवशी कमाईतल घट्ट होणार हा प्रश्न आता उभा राहिला आहे. चित्रपट रविवारी रिलीज करण्याचा निर्णय घेऊन सलमान खानने रिस्क घेतली आहे. कारण लाँग वीकेंडची कमाई सलमानला करता येणार नाही आहे. शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सर्वाधिक चित्रपट पाहिले जातात. मात्र रविवारी चित्रपट रिलीज करून चित्रपटाच्या कमाईत घट्ट होण्याची शक्यता आहे.

'सिकंदर' चित्रपटात सलमान खान सोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सलमान खान आणि रश्मिका मंदाना ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. यांचे चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. चित्रपटाच्या रिलीज झालेल्या गाण्यांमधून सलमान आणि रश्मिकाची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

सलमान आणि रश्मिकासोबतच 'सिकंदर' चित्रपटात काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर आणि शर्मन जोशी झळकणार आहे. 'सिकंदर' च दिग्दर्शन ए.आर.मुरुगदास यांनी केले आहे. 'बाहुबली' फेम अभिनेते सत्यराज 'सिकंदर' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. 'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे. चित्रपटाने रिलीजआधीच तब्बल 165 कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT