Somy Ali Cryptic Post on Abusive Relationship Saam Tv
मनोरंजन बातम्या

Somy Ali Salman Khan Ex Girlfriend: सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची खळबळजनक पोस्ट; सिनेसृष्टीतील बड्या सेलिब्रिटीवर केला गंभीर आरोप

Somy Ali Social Media Post: बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिने कोणाचंही नाव न घेता एका बड्या अभिनेत्यावर पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधलाय.

Chetan Bodke

Somy Ali Cryptic Post on Abusive Relationship: बॉलिवूडच्या भाईजानच्या अनेकदा गर्लफ्रेंड्स सोबतच्या चर्चा झाल्या आहेत. कित्येंदा सलमान खान लग्न कधी करणार अशी देखील चर्चा झाली आहे. सध्या बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली तुफान चर्चेत आली आहे. सलमान खानच्या रिलेशनशिपमुळे सध्या अभिनेत्री सोमी अली चर्चेत आली.

सोमी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. नुकतीच तिने एक पोस्ट केली आहे, त्या पोस्टमध्ये सोमीने नाव न घेता एका अभिनेत्यावर पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधलाय. सोमीची ही पोस्ट पाहून नेमकी तिने कोणाला उद्देशून पोस्ट लिहिलीय, अशी सध्या सोशल मीडियावर चर्चा होते.

सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री त्या पोस्टमध्ये म्हणते, “मला ही सोशल मीडिया पोस्ट काढण्यास सांगितलं जाईल. मला माझ्या विवेकाबद्दल विचारले जाईल. मला दारू पिण्याची समस्या असल्यामुळे माझ्याबद्दल गप्पा मारल्या जातील. तरीही मी पुढे जाईल कारण तुम्ही अशा प्रकारचा अपमान, छळ आणि कोणत्याही प्रकाराचा अत्याचार सहन केलेला नाही.”

“कोणीही तुमची बाजू घेतली नाही कारण लोक तुमचा विचार करतात की, तुमच्यासोबत गैरवर्तन करणारा एक मोठा सेलिब्रिटी आहे आणि तुम्ही त्याचे मित्र देखील आहे. तो तुमचा मित्र तुमची व्यावसायिक कारकिर्द देखील घडवू शकतो किंवा बिघडवू देखील शकतो. तुम्ही तुमच्या मित्रांवर विश्वास ठेवला होता आणि तुमची बाजू घेतील असे गृहित धरले आहे.”

आपल्या पोस्टमध्ये सोमी अली पुढे म्हणते, “मी एका अतिशय चांगल्या माणसाबद्दल इथे बोलते. त्याने असे सांगितले की, हा गैरवर्तन करणारा माणूस एक अतिशय प्रेमळ व्यक्ती आहे. मी एका अभिनेत्याचा उल्लेख करत आहे, ज्याच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे, पण मला हे देखील माहित आहे की तो रिलेशनशिपमध्ये आहे. तुम्ही मला कधीच गप्प बसवू शकणार नाही, आणि त्याचाही शेवट असेल, खूप आनंदी शेवट असलेल्या एका हॉरर चित्रपटासारखं.”

सोमी अली आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात म्हणते, “तुम्ही मला ट्रोल करण्यापूर्वी आणि माझ्याबद्दल वाईट शब्द लिहिण्यापूर्वी, मी तुम्हाला सांगते की, मी ते वाचत नाही आणि माझ्याकडे तितकं वाचण्यासाठी वेळ नाही. तुला माझे जीवन जगता आले नाही. तू त्या बंद दरवाजांच्या मागे नव्हतास. माझे जीवन, माझ्या आयुष्यातील सहन केलेल्या सर्व घटना जाणून घेण्याचा प्रयत्न तू करायला हवा. मी जे अनुभवलंय ते चांगलं की वाईट, ते तुला माहीत नाही. ज्याने तुम्हाला काहीही केले नाही अशा व्यक्तीबद्दल तुम्ही फक्त अनुमान लावत आहात. कृपया यावर थोडा विचार करा, हे फक्त माझ्याच हिताचं नाही तर इतर अनेकांसाठी ज्यांना ऑनलाइन धमकावले जाते. हे थांबायला हवे.”

सलमानच्या सिनेकारकिर्दित आतापर्यंत अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले आहे. सोमी ओलन, ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी सह अनेक अभिनेत्रींचं नाव सलमानसोबत जोडले आहे. सध्या सोमीचीही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT