Saif Ali Khan
Saif Ali Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan: चित्रपट फ्लॉप होण्याचे सैफने सांगितले कारण , सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांना दिला 'हा' सल्ला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Saif Ali Khan: बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि हृतिक रोशनचा नुकताच प्रदर्शित झालेला 'विक्रम वेधा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली खास जादू दाखवण्यात अपयशी ठरला. परंतू सिनमा प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट आपली जादू दाखवेल अशी सर्वत्र चर्चा होत होती, पण चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काही वेगळेच चित्र स्पष्ट झाले. चित्रपट पडद्यावर आल्यानंतर निर्मात्यांना प्रेक्षकांकडून खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अलीकडेच सैफने बॉलिवूडमधील चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने आपले मत मांडले आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सैफ अली खानने इंडस्ट्रीत मुख्य कलाकारांची फी कशी वाढली आहे हे सुद्धा सांगितले. 'विक्रम वेधा' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला याचे कुठेतरी हेच कारण असावे . हे अत्यंत निराशाजनक असल्याचे सैफ म्हणाला.

'विक्रम वेधा'सारखा चित्रपट बॉक्स ऑफिसवर का गाजला नाही? यावर सैफ म्हणतो की, 'विक्रम वेधा' चित्रपटाचे अनेकांनी कौतुक केले, पण बॉक्स ऑफिसवर तो चालणार नाही अशी अपेक्षा नव्हती. जेव्हा सैफला बॉक्स ऑफिसवर चित्रपट सतत चालत नसल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, 'मला माहित नाही, पण या मागील नक्कीच काही तरी मुख्य कारण असावे.ते कारण शोधण्यासाठी प्रत्येकाने कंबरकसून काम करायला लागेल.

सर्वच एकत्र येत हा प्रश्न सोडवायला हवा. दिग्दर्शक चित्रपट बनवत राहतील आणि कलाकारांची फी वाढतच जाईल. पण काही कलाकारांची फी खूप जास्त आहे. कलाकारांना फी च्या माध्यमातून खूप जास्त मानधन दिले जात आहे, पण निर्मात्यांना त्यातून इतका चांगला परतावा मिळत नाही.

सोबतच यावेळी सैफ अलीने प्रेक्षक चित्रपटगृहात जात नाही याविषयी भाष्य केले. यावर सैफ म्हणतो, फक्त 2 टक्के इतका प्रेक्षकवर्ग चित्रपट पाहण्यासाठी पैसे खर्च करतात, पण जर तोच प्रेक्षकवर्ग 20 टक्क्यांपर्यंत वाढला तर इंडस्ट्री अधिकाधिक समृद्ध होईल'विक्रम वेधा' चित्रपटाबद्दल बोलायचे तर सैफ अली खान आणि हृतिक रोशनच्या या चित्रपटाचे बजेट १०० कोटींहून अधिक होते. पण बॉक्स ऑफिसवर तो केवळ ७८ कोटींपर्यंतच कमाई करु शकला.

पुष्कर-गायत्री दिग्दर्शित हा चित्रपट 'विक्रम वेधा' या तमिळ सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. चित्रपटामध्ये आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी ही मुख्य भूमिका साकारली होती. सोबतच काही दिवसांपूर्वी 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर पाहून नेटकऱ्यांनी सैफला बरेच ट्रोल केले. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात बराच बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

Solapur Lok Sabha Voting LIVE: दक्षिण सोलापुरात 'व्हीव्हीपॅट' मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, अर्ध्या तासापासून मतदान थांबले

Baramati Lok Sabha: बारामतीत पैशांचा पाऊस, पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटले; VIDEO शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप

Ahmednagar News: मोठी बातमी! अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक; परिसरात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT