
Shriya Saran Viral Video: दाक्षिणात्य चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री श्रीया सरन आपल्या अभिनयाने सर्वत्रच प्रकाशझोतात असते. नुकतीच श्रीया 'दृश्यम २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली होती. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या श्रीयाचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत श्रीया आणि तिचा पती विमानतळावर चुंबन करताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे सध्या श्रीया आणि तिचा पती चांगलाच चर्चेत आला आहे. श्रीया या व्हिडिओत भलतीच आनंदीत दिसून येत आहे. सध्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत असून 'दृश्यम २'ला मिळत असल्याने यशाने श्रीयाच्या चेहऱ्यावरील आनंद अधिकच द्विगुणित होताना दिसत आहे.
श्रीया आणि तिचा पती विमानतळावर उघडपणे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. पापाराझींना पोज देत तिने विमानतळावरच आपल्या पतीसोबत चुंबन केले आहे. श्रीया आणि तिच्या पतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.श्रीया आणि तिच्या पतीने केलेल्या कृत्यामुळे युजर्स तिच्यावर भलतेच चिडले आहे.
या व्हिडिओवर ट्रोलर्सने श्रीयाला प्रतिक्रिया देत म्हणतात, समाजाला माहित आहे की, तुम्ही पती- पत्नी आहेत. जिथे सर्वाधिक नागरिकांचा वावर असतो तिथे हे कृत्ये करणे तुम्हाला शोभतंय का?, दुसऱ्या युजर्सने लिहिलंय की, घरातील जागा कमी पडली म्हणुन पापाराझींच्या समोर आली का? आणखी एका युजरनेही कमेंट करत म्हणाला की, कॅमेऱ्यासमोर हे कृत्ये करायला कसे काय जमतं? या आणि अशा अनेक कमेंटने तिला बरेच ट्रोल केले जात आहे.
सध्या श्रीया 'दृश्यम २' चित्रपटाच्या यशाचा आनंद लूटत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 'दृश्यम २' ने शनिवारी 21.59 कोटींची कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत आहेत.
Edit By : Chetan Bodke
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.