बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून चोरांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. या तपासासाठी पोलिसांनी २० पथकं तयार केली आहेत. तर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचा शोध सुरू आहे.
सैफवर हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान पोलिसांनी सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या ज्या मोलकरणीवर चोराने चाकू हल्ला केला त्याचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
अभिनेता सैफ आली खानच्या घरी एलीयामा फिलीप (५६ वर्षे) ही मोलकरणी म्हणून नोकरी करते. ती स्टाफ नर्स असून वांद्रेतील ग्रॅण्ड रेसिडन्सी हॉटेल समोरील थिरीसा स्कूललजवळ राहते. एलीयाना याठिकाणी गेल्या ४ वर्षांपासून राहते. ती सैफच्या घरी गेल्या ४ वर्षांपासून काम करते. ती सैफचा छोटा मुलगा जेहला सांभाळण्याचे काम करते. एलीयामासोबत जुनू नावाची नर्स देखील जेहची देखभाल करते.
- बुधवारी रात्री ११ वाजता मी जेहबाबाला जेवण करून झोपवले. त्यानंतर मी आणि जुनू झोपलो.
- पहाटे साधारण २ वाजताच्या सुमारास मला जाग आली. काहीतरी आवाज आल्याने मला जाग आली. त्यामुळे मी झोपेतून उठून बसले. त्यावेळी मला रूममधील बाथरूमचा दरवाजा उघडा दिसला आणि बाथरूमची लाईट चालू दिसली. तेव्हा मला करीनामॅम जेहबाबाला भेटण्यास आल्या असव्यात असे समजून पुन्हा झोपी गेले.
- पंरतु मला काहीतरी चुकीचे होत असल्याचा पुन्हा भास झाला. त्यामुळे मी पुन्हा उठून बसले. त्यावेळी बाथरूमच्या दरवाज्यावर एक कॅप घातलेला व्यक्तीचे सावट दिसले.
- त्यामुळे मी वाकुन बाथरूममध्ये कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करीत असताना बाथरूम मधून एका व्यक्तीने बाहेर येऊन तो जेहबाबाच्या बेडजवळ जावू लागला.
- ते पाहुन मी पटकन उठले आणि जेहबाबाजवळ गेले त्यावेळी त्याने त्याच्या तोंडाजवळ बोट नेऊन शुक शुक केले आणि "नो आवाज" असे हिंदीत बोलला. त्याच वेळी जेहबाबाची आया जुनू देखील झोपेतून उठली.
- ते पाहुन तो व्यक्ती तिला देखील "कोई आवाज नही और कोई बाहर भी नही जाएगा" असे बोलून धमकावले.
- मी जेहबाबाला उचलण्यास गेली असता तो माझ्या अंगावर धावून आला. त्यावेळी त्याच्या डाव्या हातात लाकडा सारखी काहितरी वस्तू होती आणि उजव्या हातात लांब पातळ हेक्सा ब्लेड सारखे हत्यार होते.
- त्यावेळी झालेल्या झटापटीत त्याने माझ्यावर हेक्सा ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला. मी हात पुढे करून ते वार वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या दोन्ही हाताच्या करगंळी जवळ तसेच डाव्या हाताच्या मधल्या बोटावर ब्लेडच्या वारामुळे जखम झाली.
- त्यावेळी मी त्याला विचारले "आपको क्या चाहिए. तेव्हा तो बोलला "पैसा चाहिए" मी विचारले "कितना चाहिए." तेव्हा तो इंग्रजीतून बोलला "वन करोड."
- त्याचवेळी संधी साधून जुनू ओरडत रूमच्या बाहेर गेली. तिचा आवाज ऐकून सैफ आली खान आणि करीना मॅडम धावत रूममध्ये आले.
- त्या व्यक्तीला बघून सैफसरांनी त्यास "कोण है, क्या चाहिए" असे विचारले तेव्हा त्याने हातातील लाकडी वस्तु आणि हेक्सा ब्लेड सारख्या हत्याराने सैफ सरांवर हल्ला केला.
- त्यावेळी गीतामध्ये (आणखी एक मोलकरीन) आली असता तिच्याशी देखील त्या व्यक्तीने झटापट केली आणि तिच्यावरही हल्ला केला.
- त्यावेळी सैफ अली खानने त्याच्यापासून कशीबशी सुटका करून घेतली आणि आम्ही सर्व रूमच्या बाहेर धावलो आणि रूमचा दरवाजा ओढुन घेतला.
- नतंर आम्ही सर्व वरच्या माळ्यावरील रूमकडे धावलो. तोपर्यंत आमचा आवाज ऐकून स्टाफ रूममध्ये झोपलेले रमेश, हरी, रामू आणि पासवान हे बाहेर आले.
- त्याच्या सह आम्ही पुन्हा रूमकडे गेलो असता रूमचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी त्या व्यक्तीचा घरात शोध घेतला असता तो तिथे दिसून आला नाही.
- सदर घटनेत सैफ सरांच्या मानेच्या पाठीमागील बाजूस, उजव्या खांदयाजवळ, पाठीवर डाव्या बाजूस तसेच डाव्या हाताच्या मनगटाजवळ आणि कोपराजवळ जखम होऊन त्यातुन रक्त येत होते.
- तसेच गीताच्या देखील उजव्या हाताच्या मनगटाजवळ, पाठीवर आणि चेहयावर जखमा झालेल्या आहेत.
- जेहबाबाच्या रूममध्ये घुसून माझ्यावर तसेच सैफ सर तसेच गिता यांच्यावर हल्ला करणारा व्यक्ती अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाचा असावा. सावळा वर्ण, बांधा सडपातळ, उंची अंदाजे ५ फुट ५ इंच, नेसणीस काळसर रंगाची पॅन्ट आणि गडद रंगाचे शर्ट आण डोक्यावर कॅप घातलेला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.