Saif Ali Khan Knife Attack: सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला; सैफवरील हल्ला की कट?

Saif Ali Khan: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला करण्यात आलाय. त्यामुळे अख्खं बॉलिवूड हादरलंय. हल्लेखोर सैफच्या घरात कसा घुसला? सैफवर कसा हल्ला केला ? या वरचा स्पेशल रिपोर्ट.

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

मुंबईतील हाय होल्टेज परिसर असलेल्या वांद्र्यात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर थेट त्याच्या घरात घुसून चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया करण्यात आलीय..... मात्र सैफवर हल्ला कसा झाला? पाहूयात.

कसा झाला सैफवर हल्ला?

शेजारील इमारतीची सुरक्षा भिंत ओलांडून चोर बिल्डिंगमध्ये शिरला

त्यानंतर पायऱ्या चढून चोर 12 व्या मजल्यावर सैफच्या घरात पोहचला

चोराकडून जहांगिरच्या बेडरुममध्ये शोधा-शोध

कामवाली लीमाला घरात कोणीतरी शिरल्याचा संशय

कामवालीने आरडा-ओरडा करताच चोराकडून तिच्यावर हल्ला

चोराच्या हल्ल्यात कामवाल्या लीमाच्या हाताला जखम

आरडाओरडा ऐकून सैफ बेडरुम बाहेर आला

चोर आणि सैफ अली खानमध्ये झटापट

चोराकडून सैफ अली खानवर चाकूने 6 वार

1 सैफच्या मानेवर, 1 मणक्यावर तर 4 वार हात आणि दंडावर

हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या पहिल्या पत्नीचा मुलगा इब्राहिमने सैफला रिक्षातून लिलावती रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आलीय.. तर 6 पैकी 2 वार खोलवर होते. हल्ल्यानंतर पोलीसांनी सैफच्या घरातील 8 कर्मचाऱ्यांची चौकशी केलीय... तर चोराची ओळख पटल्याने पोलीस त्याच्या मागावर आहेत.सैफची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्यावर झालेला हल्ला गंभीर आहे.. त्यामुळे हा हल्ला चोरीच्या उद्देशाने होता की सैफच्या हत्येचा कट रचण्यात आला होता? हे चोराच्या अटकेनंतर स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com