RajKummar Rao Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajkumar Rao : बँकेत फक्त १८ रुपये, चहा बिस्किटावर दिवस काढले; राजकुमारनं शेअर केला खडतर प्रवास!

Actor Rajkumar Rao Struggling Journey: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या स्त्री २ चित्रपटामुळे भरपूर चर्चेत आहे. परंतु, अभिनय क्षेत्रामध्ये येणायपूर्वी राजकुमारचं आयुष्य अत्यंत हालाकीचं होतं. राजकुमारच्या आयुष्यातील किस्से त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने २०१०मध्ये अभिनय क्षत्रात त्याचं पहिलं पाऊल टाकलं होतं. राजकुमारने दिबाकर बॅनर्जी यांच्या चित्रपटातून डेब्यू केलं होतं. राजकुमर त्याच्या अभिनयाच्या जोरावर आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या अभिनयामुळे अणि कॉमेडीमुळे त्याला चाहत्यांमध्ये अधिक प्रसिद्धी मिळाली होती. अभिनय क्षत्रामध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी राजकुमारला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत होता. रणवीर अल्लाहबादिया सोबत झालेल्या एका मुलाखाती दरम्यान राजकुमारने त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठिण काळाचा प्रसंग त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केला.

मुलाखाती दरम्यान राजकुमार म्हणाला, "अभिनय क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी मला पार्ले-जी बिस्किटांवर आणि फ्रूटीच्या ज्यूसवर दिवस काढायला लागत होते. मी मुंबईमध्ये अनेक दिवस उपाशी राहात होतो. माझ्या बँकेमध्ये फक्त १८ रुपये शिल्लक होते. माझ्या या दिवसांमध्ये माला माझ्या आईने खुप साथ दिली होती. माझ्या खात्यातील पैसे संपल्यावर आई माझ्यासाठी घरुन पैशांची व्यवस्था करायची." हा खडतळ प्रवास सांगतांना राजकुमारला त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आठवत होते. परंतु, आयुष्यातील संघर्षामुळे आणि जिद्दीमुळे राजकुमारने खुप प्रसिद्धी कमवली आहे.

राजकुमारने पुढे सांगितलं " मुंबईसारख्या शहरात तुमच्याकडे फक्त 18 रुपये शिल्लक असणं आणि तुमच्याकडे कोणतही कमाईचं साधन नसणं या पेक्षा कठिण परिस्थिती अजून काय असू शकते. मी आणि माझे मित्रा त्याकाळात एका फ्लॅटमध्ये राहात होतो. जास्त पैसे खर्च होऊ नये म्हणून मी दुपारच्या जेवणामध्ये एक पार्ले-जी चा पुडा आणि फ्रूटी प्यायचो. त्यावेळी माझ्या दुपारच्या जेवणाचा खर्च ४ रुपये होत होता. पैशांची बचत करण्यासाठी अनेकदा उपाशी राहायचो."

मुंबईमध्ये येण्यापूर्वी राजकुमारने अभिनय क्षत्रातील प्रवास सुरु केला होता. दिल्लीमध्ये अस्ताना दररोत राजकुमार १४० किलोमिटर सायकलवर प्रवास करून त्याच्या अॅक्टिंग स्कूलला जायचा. त्या शाळेमध्ये प्रशिक्षण घेताना राजकुमारने अभिनय क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. शाळेतील शिक्षणानंतर राजकुमारने दिल्लीतील श्री राम सेंटरमध्ये प्रवेश घेतला. राजकुमारच्या स्त्री२ ची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. 'स्त्री २' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून नवा इतिहास देखील रचला आहे. अनेक चाहत्यांना राजकुमारच्या 'शादी मै जरुर आना' चित्रपटामधील मधील अभिनय खूप आवडतो.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

Jio चे दमदार रिचार्ज प्लान्स! एका रिचार्जमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन एकदम FREE, तुम्ही पाहिलेत का?

Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? अजित आगरकर पहिल्यांदाच इतका स्पष्ट बोलला

Saturday Horoscope : धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ कार्य हातून घडणार; ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

SCROLL FOR NEXT