Statements Of Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? स्टेटमेंटमध्ये तपासा या महत्त्वाच्या गोष्टी, पैशांची बचत करण्यात होईल मदत

Credit Card : तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला दर महिन्याला क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मिळेल.
Statements Of Credit Card
Statements Of Credit Card Saam Tv
Published On

Statements Check For Saving Money :

तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला दर महिन्याला क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मिळेल. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट हे कागदपत्र आहे, ज्यामध्ये कंपनीने लादलेल्या प्रत्येक शुल्काचा तपशील असतो. अशा स्थितीत तुमच्याकडे क्रेडिट कार्ड स्टेटमेंटची संपूर्ण माहिती असली पाहिजे. त्याच्या मदतीने, आपण लपविलेले शुल्क शोधून पैसे (Money) वाचवू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये कोणती माहिती असते?

  • क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये पेमेंट (Money) ड्यू म्हणजेच तुम्हाला किती बिल भरायचे आहे, संपूर्ण रक्कम लिहिलेली असते.

  • सोबत पेमेंटची ड्यू तारीख लिहिलेली असते. म्हणजे किती तारखेपर्यंत तुम्हाला बिल जमा करण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

Statements Of Credit Card
Chanakya Niti On Money : आयुष्यात ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही पैशांची कमतरता होणार नाही
  • किमान देय रक्कम लिहिली आहे. ही रक्कम आहे जी तुम्हाला देय तारखेला भरायची आहे. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्याने क्रेडिट कार्डची किमान रक्कम भरली नाही, तर विलंब शुल्क लागू केले जाते. 

  • क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये क्रेडिट मर्यादा माहिती असते. बिलिंग सायकलच्या तारखा देखील लिहिल्या जातात.

  • क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये बिलिंग सायकलमध्ये केलेल्या व्यवहारांची संपूर्ण माहिती असते. त्याच्या बक्षिसे आणि सवलतींचे तपशील देखील आहेत. 

Statements Of Credit Card
Credit Card Tips : एकपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असावे का? फायदे-तोटे नीट समजून घ्या

क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये या गोष्टी तपासल्या पाहिजेत 

अनेक वेळा क्रेडिट कार्ड कंपन्या फायनान्स चार्ज, फॉरेन ट्रान्झॅक्शन फी, बॅलन्स ट्रान्सफर फी, कॅश अॅडव्हान्स फी, लेट पेमेंट फी, कार्ड रिप्लेसमेंट फी आणि रिटर्न पेमेंट फी यांसारखे छुपे शुल्क स्टेटमेंटमध्ये जोडतात. जर तुम्हाला तुमच्या स्टेटमेंटमध्ये असे शुल्क दिसले, तर तुम्ही हे शुल्क काढून टाकण्याबाबत बँकेशी बोलले पाहिजे. तुम्ही हे छुपे शुल्क काढून पैसे वाचवू शकता. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com