प्रविण वाकचौरे
गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
सध्या क्रेडिट कार्ड सहज उपलब्ध होत असल्याने लोकांकडे वेगवेगळ्या कंपन्यांची अनेक क्रेडिट कार्ड्स आहेत.
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असताना त्याचे फायदे आणि तोटे देखील समजून घेतले पाहिजेत.
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास, तुमची खर्च करण्याची क्षमता वाढते.
अधिक क्रेडिट कार्ड्स असल्यास, तुम्ही एका क्रेडिट कार्डवरून दुसऱ्या क्रेडिट कार्डवर बिल भरू शकता. याला बॅलेन्स ट्रान्सफर सुविधा म्हणतात.
जास्त क्रेडिट कार्ड असण्याने तुमची क्रेडिट लिमिटही वाढते. अशा परिस्थितीत अनेक लोक विनाकारण पैसे खर्च करतात.
यामुळे कर्जाच्या सापळ्यात अडकण्याचा धोका निर्माण होतो.
क्रेडिट कार्डचं बिल भरण्यास उशीर झाल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो.
क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क देखील भरावे लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या गरजेनुसार विचार करूनच अधिक क्रेडिट कार्ड्स ठेवण्याचा निर्णय घ्यावा.