Rajkumar Wife Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Veteran Actor Rajkumar Wife Dies: दिग्गज अभिनेते राजकुमार यांच्या पत्नीचे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Rajkumar Wife Death: ज्येष्ठ दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांचे निधन झाले.

Chetan Bodke

Rajkumar Wife Passed Away

बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांचे निधन झाले. २८ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायत्री यांच्या निधनाचे कारण जरीही अस्पष्ट असलं तरी, वयोमानानुसार त्यांचे निधन झाल्याचे बोलले जात आहे. राजकुमार यांच्या निधनानंतर गायत्री आपल्या तीन मुलांसोबत मुंबईमध्ये राहत होत्या. (Bollywood)

गायत्री यांच्यासोबत मुंबईमध्ये, पारू राज कुमार, पाणिनी राज कुमार आणि मुलगी वास्तविकता पंडित यांच्यासोबत राहत होत्या. गायत्री पंडित गेल्या २७ वर्षांपासून पतीशिवाय एकटीनेच सर्व संसाराचा गाडा हाकलला. गायत्री यांच्या निधनामुळे फक्त राजकुमार यांच्या फॅमिलीवर नाही तर अवघ्या बॉलिवूड इंडस्ट्रीवरही शोककळा पसरली आहे. ३ जुलै १९९६ रोजी राजकुमार यांचे निधन झाले होते. राजकुमार यांचे निधन घशाच्या कर्करोगामुळे झाले होते. (Bollywood Film)

राजकुमार यांनी आपल्या सिनेकारकिर्दित अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनयामध्ये काम करण्यापूर्वी राजकुमार यांनी इन्स्पेक्टर म्हणून नोकरी केली होती. पण खाकी वर्दीतली नोकरी सोडून त्यांना अभिनयामध्ये पाऊल ठेवले. राजकुमार यांनी ‘तिरंगगा’, ‘सौदागर’, ‘हीर रांझा’, ‘पाकिझा’, ‘मदर इंडिया’, ‘वक्त’, ‘नील कमल’, ‘जवाब’, ‘लाल पत्थर’, ‘झिंदगी’, ‘काजल’, ‘राज तिलक’, ‘साजीश’, ‘घराणा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT