R Madhavan TEXT Film Shooting Wrapped Up Saam Tv
मनोरंजन बातम्या

R Madhavan Film Shot Wrap: आर माधवनच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग आटोपलं, दिसणार ‘हे’ कलाकार

R Madhavan Film Shooting Wrapped Up: बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता आर माधवनच्या आगमी चित्रपटाची शूटिंग संपलं आहे.

Chetan Bodke

R Madhavan Wrapped up Shooting Upcoming Film Test: बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता आर माधवन नेहमीच आपल्या अभिनयासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सध्या आर माधवन त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याच्या आगमी चित्रपटाची शूटिंग संपली आहे. ‘रॉकेटरी: द नंबी’ नंतर आर माधवनचा ‘टेस्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग नुकतंच संपल असून नुकतंच त्याने चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केल्याचं समजतंय.

आर माधवन याची ओळख प्रेक्षकांमध्ये, एक अष्टपैलू अभिनेता आणि अभिनायची अनोखी शैली अशी कायम आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटात अभिनेत्याची एक रंजक भूमिका असल्याचे दिसून येत आहे. क्रिकेट टेस्ट मॅचवर आधारित असलेल्या या चित्रपटात क्रिकेट रसिकांना हा चित्रपट म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत आर माधवन, सिद्धार्थ सोबत नयनतारा देखील दिसणार आहे. आर माधवन आणि सिद्धार्थ या चित्रपटासाठी १७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेल्या या चित्रपटासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.

माधवनला ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या बायोग्राफिकल चित्रपटाने यंदाच्या आयफा अवॉर्डसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकला आहे. चित्रपटाच्या लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीची धुरा माधवनने आपल्या खांद्यावर पेलली होती. तसेच, त्याने स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमावला होता.

तर आर माधवनच्या पुढील प्रोजेक्टबद्दल बोलायचे तर, आर माधवन लवकरच अजय देवगण आणि ज्योतिका यांच्यासोबत एका सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे, चित्रपटाचं टायटल अद्याप जाहीर झालेले नाही. अजय आणि माधवन पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यासाठीही चाहते उत्सूक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

भर मंडपात नवरदेवासह नातेवाईकांना डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न! प्रेमविवाहाचा असा बदला पाहून हादरून जाईल मन

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

SCROLL FOR NEXT