Karan Deol Wedding: बँड बाजा वरात घोडा, अखेर सनीच्या लेकानं लगीनगाठ बांधली...

Karan Deol Wedding Viral Photos: बॉलिवूड अभिनेता करण देओल आणि द्रिशा आचार्य आज लग्नबंधनात अडकला आहे.
Karan Deol Wedding
Karan Deol WeddingInstagram
Published On: 

Karan Deol Wedding Photos: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल आणि द्रिशा आचार्य आज लग्नबंधनात अडकला आहे. करणच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. यावेळी संपूर्ण देओल कुटुंबीय लग्नासाठी एकत्र आले आहे. हे संपूर्ण कुटुंबीय सध्या लग्नात व्यग्र आहे. सनी देखील आपल्या लाडक्या लेकाच्या लग्नात धमाल- मस्ती करण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाही. सोबतच लग्नात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल देखील लग्नात खूपच आनंदित दिसून आले.

Karan Deol Wedding
Asees Kaur - Goldie Sohel Wedding : प्रसिद्ध सिंगर असीस कौर आणि कंपोजर गोल्डी सोहेल गुपचूप अडकले लग्नबंधनात

करण आणि द्रिशा यांच्या लग्नाचे विधी करतानाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये लग्नसोहळा पार पडला. अग्निसमोर सात फेरे घेऊन करण आणि द्रिशाचा आर्य समाज पद्धतीने विवाह पार पडला. तर, लग्नाचे रिसेप्शन देखील याच हॉटेलमध्ये संध्याकाळी पार पडणार आहे. करण- द्रिशा या दोघांनीही या खास प्रसंगी पारंपारिक पोशाख परिधान केले होते. त्यांच्या लूक्सचे आणि लग्नाचे पारंपारिक विधी पार पडतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी संपूर्ण देओल कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मुख्य बाब म्हणजे, यावेळी आपल्या लाडक्या नातवाच्या लग्नात बॉलिवूडचे लाडके सुपरस्टार धर्मेंद्र यांनी आपल्या वयाच्या ८७व्या वर्षी देखील धमाकेदार डान्स करून सर्वांनाच अचंबित केले आहे.

द्रिशा ब्राइडल लूकमध्ये असून करणचाही वेडिंग ड्रेस खूपच त्याला शोभून दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि फोटोत करण देओल घोड्यावर चढताना दिसत आहे. करणच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. या खास प्रसंगी संपूर्ण देओल कुटुंबीय दिसत असून करणचे काका आणि अभिनेता अभय देओलही या लग्नात सहभागी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com