Pankaj Tripathi  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pankaj Tripathi: पंकजने दिला जुन्या गोष्टींना उजाळा, छट पुजेची खास आठवण केली शेअर

भारतभर छट पुजा हा सण साजरा करण्यात येणार आहे. पंकजने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना महत्व सांगत सणाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pankaj Tripathi Chhath Pooja Celebration: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आपल्या उत्कृष्ट भूमिकांसाठी आणि सोबतच त्याच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यामुळे घराघरात प्रसिद्ध आहे. त्याच्या साधेपणामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीत त्याची ओळख आहे. येत्या काही दिवसात छट पूजा संपूर्ण भारतात साजरी होणार आहे. त्या लोकप्रिय सणाबद्दल पंकजने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना महत्व सांगत सणाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. (Bollywood)

गेली काही वर्षं छठपूजेच्या दिवशी पंकज आपल्या गावी जायचा, पण सध्या कामात प्रचंड व्यग्र असल्याने त्याला गावी जाऊन पूजा करण्याची संधी मिळत नसल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी पंकज जुहू येथे होणाऱ्या 'छठ पूजा' कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. (Chhath Puja 2022 wishes)

पंकजने एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या माहितीप्रमाणे, 'हा सण निसर्ग जपण्याचा एक मार्ग असल्याचे सांगितले. या पूजेदरम्यान आपण सूर्याची आराधना करतो आणि निसर्गाला जगण्यासाठी पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरज असल्याची आपल्याला जाणीव होते.

या माध्यमातून आपण निसर्गाची उपासना करतो. निसर्ग जे आपल्याला देतो त्याबद्दल आपण त्याचे आभार मानतो. आपण निसर्गाचा आदर केला पाहिजे आणि पर्यावरणाची नीट काळजी घेतली पाहिजे हीच शिकवण छठपूजेतून दिली जाते.'

गावी पूजा करताना त्याने आपल्या काही खास आठवणी शेअर केल्या आहेत. गावातील प्रत्येकजण आपापली पिके - फळांपासून धान्यापर्यंत एकमेकांना वाटप करतात. या सणाची हीच गोष्ट आहे, आपल्या सामानांची अदान- प्रदान करत हा सण साजरा करणे. अनेक गोष्टींची यावेळी त्याने आठवण करून दिली आहे. अजूनही गावांमध्ये या जुन्या आठवणी जपत छट पूजा साजरी केली जाते.

ओटीटीवरील 'क्रिमिनल जस्टिस'च्या नवीन सीझनमध्ये अभिनेता शेवटचा दिसला होता, ज्याला खूप प्रेम मिळाले. अभिनेता पुढील 'OMG ओह माय गॉड 2' मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT