Bollywood Actor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bollywood Actor : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने केले वार, प्रकृती चिंताजनक

Pankaj Tripathi Brother Attacked : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. भावाची प्रकृती चिंताजनक आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावावर जीवघेणा हल्ला

शरीरावर धारदार शस्त्राने केले वार

भावची प्रकृती चिंताजनक

मनोरंजन विश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावावर जीवघेणा हल्ला झाला असून भावाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच भाऊ रुग्णालयात दाखल आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या भावावर बिहारमधील गोपालगंज येथे हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

IANS च्या वृत्तानुसार, अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा भाऊ बिजेंद्र नाथ तिवारी यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. ही घटना गोपालगंज, बिहार येथे घडली. बिजेंद्र नाथ तिवारी यांना उपचारांसाठी पाटण्याला हलवण्यात आले आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे म्हटले आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीसांचे पथक हल्लेखोरांना पकडण्यासाठी छापेही टाकत आहे. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

बिजेंद्र नाथ तिवारी यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पाटणा येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. पंकज त्रिपाठी यांच्या भावाची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आरोपींची ओळख पटवत आहेत. पोलिसांनी पंकज त्रिपाठी यांचे कुटुंबीय आणि जवळपास राहणाऱ्या रहिवाशांचीही चौकशी केली आहे. या प्राणघातक हल्ल्यामागील खरे कारण तपासानंतरच समोर येईल.

IANS ने शेअर केलेल्या व्हिडीओत, डॉक्टर रुग्णालयात बिजेंद्र नाथ तिवारी यांच्यावर उपचार करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ गोपालगंज मॉडल हॉस्पिटलमधील आहे. रुग्णालयात लोकांची गर्दीही दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact-Check: रक्षाबंधनाला शेतकऱ्यांना 4 हजार रूपये? केंद्र सरकार शेतकऱ्यांना वाढीव 2 हजार देणार?

Gold Prices: सोनं का महागतंय? सोनं 3 लाखांच्या पार जाणार?

मुंबईच्या चाळीतील ७ खेळाडूंचा भूतानमध्ये कहर; दक्षिण आशियाई बॉक्स-लंगडी चॅम्पियनशिपमध्ये जिंकली सुवर्णपदकं

सर्वसामान्यांना महागाईचा झटका, सणासुदीत साखर कडू, रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ

Eng vs Pak Highlights : इंग्लंडनं पाकिस्तानला दिला ८ वर्षांनंतर जबरा झटका; एक डाव आणि १०३ धावांनी उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT