Nawazuddin Siddiqui Visit On Shivtirtha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui ने घेतली राज ठाकरेंची भेट; मराठी भाषा दिनानिमित्त नव्या कलाकृतीतून चाहत्यांच्या भेटीला

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui Visit On Shivtirtha: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कामामुळे कमी आणि घरातील वादांमुळे जास्त चर्चेत आहे. नवाजची पत्नी आलिया सिद्दीकीने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर मारहाण करणे, खोलीत कोंडून ठेवणे असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. याच सर्व पार्श्वभुमीवर बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. नुकतेच त्यांच्या भेटीमागील कारण स्पष्ट झाले असून नवाझने स्वतः ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नवाजुद्दीनच्या घरात वादाचे खटके उडत आहेत. त्यांच्यातील वाद आता हा सर्वश्रुत झाला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांने राज ठाकरे यांची आज दुपारी शिवतीर्थवर भेट घेतली आहे. येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरे करण्यासाठी त्याने ती भेट घेतल्याची आपल्या सोशल मीडिया पेजवरुन माहिती शेअर केली आहे

"मराठी भाषा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली आहे! मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लोककला यांचा मी चाहता आहेच !सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा !! लवकरच अभिजित पानसे यांच्या सोबत काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे. #जयमहाराष्ट्र", असं ट्विट करत नवाझुद्दीनने शिवतीर्थावर का गेला होता याचा खुलासा केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी नेहमीच कलाकार मंडळींची रेलचेल असते. आज राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी आज मराठी-हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी भेट दिली. आज सकाळीच 'बिग बॉस १६' चा उपविजेता आणि 'बिग बॉस मराठी २' चा विजेता शिव ठाकरेने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! भाजप नेत्याच्या पुतण्याची चाकू भोसकून हत्या; क्षुल्लक कारणावरून संपवलं, कारण काय?

Soft Chapati Tips: मऊ अन् फुलणारी चपाती बनवण्याचे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: मनमाड शहरात विजांच्या गड गडाटासह जोरदार पावसाची हजेरी

Sarfaraz Khan: 'खान' आडनावामुळे खेळाडूला डच्चू; सरफराजच्या सिलेक्शनवरून वाद पेटला, औवेसीनंतर काँग्रेस नेत्याचे गौतमवर 'गंभीर' आरोप

Bhau Beej 2025: भाऊबीज करताना आरतीच्या ताटात ठेवा या वस्तू, संपूर्ण लिस्ट वाचा

SCROLL FOR NEXT