Nawazuddin Siddiqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: नवाझुद्दीनचे 'हे ' आवडते राजकीय नेते, पण मुलाखतीत जरा स्पष्टच बोलला...

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या वादग्रस्त विधानांनी अनेकदा चर्चेत असतो. त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपटसृष्टीत वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या वादग्रस्त विधानांनी अनेकदा चर्चेत असतो. त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपटसृष्टीत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जरी ही नवाजुद्दीन इतका प्रसिद्धी झोत्यात असला तरी ही तो नेहमीच छोट्या छोट्या भूमिकेत दिसतो. नवाझुद्दीनने आत्तापर्यंत उत्कृष्ट कथानक, उत्कृष्ट आशय असणाऱ्याच चित्रपटात काम केले आहे. तो सर्वाधिक प्रकाशझोत्यात आला 'बजरंगी भाईजान' चित्रपटामुळे.

त्याने अशा अनेक चित्रपटांतून आपल्या उत्कृष्ट अभिनयाची किमया दाखवली आहे. नेहमीच नवाजुद्दीन सिद्दीकी राजकीय विचारांमुळे चर्चेत असतो. सध्या देशात बरेच निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यात सर्वाधिक नावाजलेले नाव म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आहेत. हे नेहमीच देशाच्या जनतेसाठी चर्चेच्या अग्रस्थानी असतात.

एका संकेतस्थळाला गेल्या काही दिवसांपूर्वी मुलाखत दिली. त्यावेळी नवाझुद्दीनला या तीन राजकीय नेत्यांचे नाव सांगून आवडता राजकीय नेता कोण आहे? हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी नवाझुद्दीन सिद्दीकी म्हणतो, “माझ्यामते सगळे त्यांच्या त्यांच्या जागी मोठे आहेत. मात्र नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असल्याने मी त्यांचे नाव घेतो पण बाकीचेदेखील मोठे नेते आहेत.” असे त्याने स्पष्ट उत्तर दिले.

सध्या नवाझुद्दीन एका व्यक्तिरेखेमुळे बराच चर्चेत आहे. त्याने 'हड्डी'मध्ये एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT