Nawazuddin Siddiqui Court Order Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui Case: नवाझुद्दीन सिद्दीकी कौटुंबिक वादावर लवकरच सुनावणी; कुटुंबियांसह न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश

Nawazuddin Siddiqui Defamation Case: नवाझुद्दीनची सार्वजनिक जीवनात प्रतिमा खराब केल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे.

Pooja Dange

सचिन गाड

Court Gave Order To Nawazuddin Siddiqui: बॉलिवूड अभिनेता नवाझऊद्दीन सिद्दिकी याच्या जीवनात सध्या तणाव निर्माण झाला आहे. त्याचा आणि त्याच्या पत्नी आलियाचा वाद अजून सुरू आहे. त्यात आता नवीन प्रकरण समोर आले आहे. नवाझुद्दीनच्या भावाने त्याची फसवणूक केली आहे. भावाने केलेल्या फसवणुकीची दाद मागण्यासाठी नवाझुद्दीनने थेट न्यायाल यात धाव घेतली आहे.

नवाझुद्दीन सिद्दीक आणि कुटुंबियांना 3 एप्रिलला हायकोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. नवाझ, पत्नी, दोन्ही मुले आणि भाऊ शमशुद्दीन यांना कोर्टात हजर राहून आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश न्यायालायने दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या दालनात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

पत्नीनं मुलांना जबदरस्तीनं दुबईहून इथं आणले असून त्यांना आपल्याला भेटण्यास मनाई केल्याचा आरोप नवाझुद्दीन सिद्दीकने केला आहे. तर पत्नी झैनब आणि भाऊ शमशुद्दीन यांनी नवाझवर प्रतिआरोप केले आहेत. बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीने, भाऊ आणि पत्नी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याची दाखल केली आहे.

नवाझुद्दीन सिद्दीकने दाखल केलेल्या याचिकेत 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. भाऊ शमशुद्दिन सिद्दीकी आणि पत्नी झैनब सिद्दीकी यांनी नवाझुद्दीन बाबत दिशाभूल करणारी वक्तव्य केल्याचा दावा देखील याचिकेत करण्यात आला आहे. त्याच्या विरोधातील पोस्ट आणि आर्टिकल बदनामीकारक असून नवाझुद्दीनची सार्वजनिक जीवनात प्रतिमा खराब केल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे.

नवाझुद्दीन सिद्दीकीने भावाला काम नसल्याने स्वतःच मॅनेजर म्हणून कामाला ठेवले होते. त्याने स्वतःच सर्व आयडी,पासवॉर्ड बँक बुक, चक्र बुक डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सर्वच भावाला दिले होते. त्यानंतर भावाने आणि त्याच्या पत्नीने नवाजची फसवणूक केली. सर्व मालमत्ता नावाजच्या नावावर घेतल्याचे सांगून जॉईंट ओनरशिपमध्ये घेतली आहे.

तसेच नवाझुद्दीन सिद्दीकीच्या भावाने २०२०पडून त्याच्यासोबत काम करणे बंद केले. नवाझुद्दीनच भूक त्याचे सगळेच व्यवहार बघत होता. परंतु तो गेल्यानंतर नवाझुद्दीनला टॅक्स नोटीस आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे, अनेक वाहनांचे टायर फुटले; नेमका प्रकार काय? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT