Lord Ram Character: टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये कलाकार अनेक विभिन्न भूमिका साकारत असतात. त्यातिल काही कलाकृती प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात तर काही त्यांच्या हृदयात घर करतात. जर एखादी भूमिका आध्यत्मिक असेल तर प्रेक्षक त्या कलाकाराची पूजा देखील करतात.
आज राम नवमी आहे . रामचा जन्म दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तर आपण देखील राम नवमीच्या या खास दिवशी पाहूया पडद्यावर रामची भूमिका कोणी-कोणी साकारली ते.
पहिली रामाची प्रसिद्ध झालेली भूमिका साकारली अभिनेते अरुण गोविल यांनी, 80 च्या दशकात रामानंद सागर यांच्या टीव्ही शो रामायणमध्ये भगवान रामाच्या भूमिकेत ते दिसले होते. पडद्यावर प्रभू रामाची भूमिका साकारून जर कोणी सर्वाधिक प्रसिद्ध झालं असेल तर ते म्हणजे अरुण गोविल. या व्यक्तिरेखेसाठी लोक त्यांना आजही ओळखतात.
अभिनेता नितीश भारद्वाज, जे महाभारतातील भगवान कृष्णाच्या भूमिकेसाठी लोकप्रिय आहेत. मात्र, 2001 मध्ये जेव्हा रामायण पुन्हा तयार करण्यात आले तेव्हा ते रामाच्या भूमिकेत दिसले होते.
2008 मध्येही टीव्हीवर रामायण नावाचा मालिका आली होती, ज्यामध्ये गुरमीत चौधरी रामाच्या भूमिकेत होता. या पात्राने गुरमीतला वेगळी ओळख दिली. आज तो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे.
2015 मध्ये 'सिया के राम' नावाची मालिका टीव्हीवर यायची, ज्याने जवळपास 1 वर्ष लोकांचे मनोरंजन केले. या शोमध्ये आशिष शर्मा रामाच्या भूमिकेत होता.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. त्यात भगवान रामाच्या भूमिकेचा देखील समावेश आहे. 1997 मध्ये आलेल्या लव कुश या चित्रपटात यांनी ही भूमिका साकारली होती.
साऊथ सुपरस्टार प्रभासचा आगामी चित्रपट आदिपुरुष बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.