Dr. Girish Oak Post: 'माझा प्रतिस्पर्धी मीच...' अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची पोस्ट चर्चेत

Zee Natyagaurav 2023: अभिनेते डॉ. गिरीश ओक यांना नाटकांंसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्राप्त.
Dr. Girish Oak Facebook Post
Dr. Girish Oak Facebook Post Saam TV
Published On

Dr. Girish Oak Best Actor: काही दिवसांपूर्वी झी चित्रगौरव २०२३ हा सोहळा दिमाखात पार पडला. चित्रपट सृष्टीत काम उत्तम काम केलेल्या सर्वांचा येथे गौरव करण्यात आला. झी चित्रगौरवनंतर प्रेक्षक झी नाट्यगौरवची वाट पाहत आहे.

झी नाट्यगौरव सोहळा संपन्न झाला आहे. झी मराठीच्या सोशल मीडियावर याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. अभिनेते डॉ. गिरीश ओक यांना नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत गिरीश ओक यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Dr. Girish Oak Facebook Post
Adipurush Poster: ओम राऊतची खास भेट; जय श्री राम म्हणत केलं 'आदिपुरुष'चं नवीन पोस्टर शेअर

डॉ. गिरीश ओक यांनी त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'माझा प्रतिस्पर्धी मीच, असं इतर कोणाच्या बाबतीत झालंय की नाही मला माहीत नाही पण माझ्याबाबतीत तरी पहिल्यांदा झालं. सध्या माझी दोन नाटकं सुरू आहेत "३८ कृष्ण व्हिला" आणि "काळी राणी". झी नाट्यगौरवला या दोन्ही नाटकांसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून मला नामांकन मिळालं.

दोन विरुध्द टोकाच्या भूमिका माझ्या माध्यमातून एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आणि काल चक्क दोन्ही भूमिकांना सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. मला कळंतच नाहिये मी माझ्या कुठल्या भूमिकेचं अभिनंदन करू ते. आता तुम्हीही विचाराल तुम्हाला कोणत्या भूमिकेसाठी हवं होतं ?

पण असं नाही ना सांगता येत. एकीचं नाव घेतलं तर दुसरी माझ्यावर नाराज होणार आणि मलाच दोन्ही भूमिकांचे अजून खूप प्रयोग करायचे आहेत. "३८" चे १२५ होत आले आहेत आणि "राणी" चे ५० फक्त.

गिरीश ओक याआधी झी मराठीवरील एका मालिकेत दिसले होते. 'अगं बाई सासूबाई' या मालिकेतील अभिजित राजे हे त्यांचे पात्र प्रेक्षकांना होत. सध्या गिरीश ओक विजय केंकरे दिग्दर्शित 'काळी राणी' आणि '३८ कृष्ण व्हिला' या नाटकांमध्ये काम करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com