Adipurush Poster: ओम राऊतची खास भेट; जय श्री राम म्हणत केलं 'आदिपुरुष'चं नवीन पोस्टर शेअर

Om Raut Share Adipurush Poster: राम नवमीनिमित्त आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
Adipurush Poster
Adipurush PosterInstagram @omraut
Published On

Adipurush New Poster Released On Ram Navami: राम नवमीनिमित्त आज आदिपुरुष चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. रामवर आधारित आणखी एक चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाच्या टीझरवरून बराच गदारोळ निर्माण झाला होता. आता या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

राम नवमीनिमित्त आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. आज पर्यंत आपण पोस्टरच्या माध्यमातून फक्त राम म्हणजे प्रभासच लूक पाहिला आहे. आता आपल्याला चित्रपटातील इतर पात्र देखील भेटीस आली आहेत.

Adipurush Poster
TMKOC: दयाबेन 'तारक मेहता..' मालिकेत पुन्हा परतणार? दिशा वकाणीच्या वापसीवर निर्माते स्पष्टच बोलले

दिग्दर्शक ओम राऊत यांनी आज त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टर पोस्ट केले आहे. तसेच हे पोस्टर शेअर करताना त्यांना कॅप्शनमध्ये, 'मंत्रों से बढ़के तेरा नाम, जय श्री राम' असे तीन भाषांमध्ये लिहिले आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आदिपुरुषच्या पोस्टरमध्ये सीता, राम, लक्ष्मण आणि हनुमान दिसत आहेत. प्रभास राम आणि सीता क्रिती सेनन साकारत आहेत याची कल्पना आहे. तर लक्ष्मणाच्या भूमिकेत सोनू के टिट्टू की स्विटी या चित्रपटातील अभिनेता सनी सिंह दिसत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

हा चित्रपट १६ जून, २०२३ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर आता चित्रपटप्रेमींना या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे. चित्रपटप्रेमी कमेंट करून ओम राऊत यांनी ट्रेलर कधी प्रदर्शित होणार हे विचारत आहे.

काही महिन्यांपूर्वी जेव्हा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा अनेक वाद निर्माण झाले होता. लोकांना चित्रपटाचे व्हीएफएक्स आवडले नव्हते. तर सैफ अली खान साकारत असलेल्या रावणाच्या भूमिकेवर देखील लोकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर या चित्रपटात बदल करण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. तसेच ओम राऊत यांनी देखील व्हीएफएक्स वर काम करत असल्याचे सांगितले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com