Naseeruddin Shah Angry On Fans Video Instagram
मनोरंजन बातम्या

Naseeruddin Shah Video: सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर नसीरुद्दीन शाह भडकले; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

Naseeruddin Shah Angry Viral Video: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच पुन्हा एकदा अभिनेते नसीरुद्दीन शाह एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.

Chetan Bodke

Naseeruddin Shah Angry On Fans

सर्वाधिक सक्षम अभिनेत्यांपैकी एक असलेले नसीरूद्दीन शाह. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप निर्माण केली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच पुन्हा एकदा अभिनेते नसीरुद्दीन शाह एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.

सोशल मीडियावर नसीरुद्दीन शाह यांचा विमानतळावरील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ते विमानतळावर दिसताच त्यांच्या काही चाहत्यांनी सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली. ती गर्दी पाहून नसीरुद्दीन शाह चाहत्यांवर चांगलेच संतापले आहेत.

सध्या नसीरुद्दीन शाह 'शोटाइम' चित्रपटामुळे बरेच चर्चेत आहेत. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि त्यांच्या स्पष्टवक्ते विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये नसीरुद्दीन शाह यांच्या चेहऱ्यावर मास्क आणि हातात पुस्तक पाहायला मिळत आहे. विमानतळावरून जात असताना त्यांच्याभोवती चाहत्यांची सेल्फीसाठी एकच गर्दी जमा होते. ती गर्दी पाहून त्यांनी चाहत्यांना सेल्फीसाठी नकार दिला. आणि त्यासोबतच त्यांनी चाहत्यांवर संतापही व्यक्त केला. ते चाहत्यांना ओरडत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये नसीरुद्दीन शाह ओरडत म्हणतात, “तुम्ही लोकांनी खूप चुकीचं काम केले आहे. तुम्ही डोकं फिरवण्याची कामं करतात, तुम्हाला एकदा सांगितलेलंही कळत नाही का? एखादा माणूस कुठे जात असेल तेव्हाही तुम्ही त्याला सोडत नाहीत. तुम्हाला का समजत नाही?”, असे नसीरुद्दीन चाहत्यांना चिडून म्हणाले.

यानंतर व्हिडीओमध्ये एक चाहता, “जाऊदे मित्रा, काही करु नकोस. असू दे, त्यांनी नकार दिला आहे तर” असं म्हणाताना दिसत आहे. अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमुळे नसीरुद्दीन शाह चांगलेच ट्रोल होताना दिसत आहे. नेटकरी त्यांना ट्रोल करण्याची कोणतीही कसर सोडत नाही. एक युजर म्हणतो, “ही खूप वाईट वागणूक आहे. आपल्याला प्रसिद्धी ही चाहत्यांमुळेच मिळत आहे, ही गोष्ट विसरू नका.” तर एक आणखी एका युजरने म्हणतो, “प्रसिद्धी मिळवायची आहे, फक्त ॲटिट्यूड दाखवण्यासाठी. किमान बोलताना आपल्या वयाचा विचार करावा, ही विनंती.”, असं एक युजर म्हटला आहे. “त्यांचं वय झालंय, त्यांना एकटं सोडा.” असं म्हणत नेटकरी त्यांना ट्रोल करीत आहे.

नसीरुद्दीन शाह यांच्या कामाबद्दल बोलायचे तर, इम्रान हाश्मी, माहिमा मकवाना, मौनी रॉय स्टारर चित्रपटात नसीरुद्दीन शाह दिसणार आहे. त्यांचा हा चित्रपट येत्या ८ मार्च २०२४ ला ‘डिज्ने प्लस हॉटस्टार’या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Sanitizer Disadvantage : प्रवासात सॅनिटायझर वारंवार हाताला लावताय? वेळीच व्हा सावध! अन्यथा

वही आणायला १० रुपये मागितले तर पप्पा...; शेतकऱ्याच्या लेकीची व्यथा, रोहित पवारही भावूक, पाहा, VIDEO

पाकिस्तान तोंडघशी! पहलगामचे फोटो TRF ने पोस्ट केले, दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारली, UNSC च्या रिपोर्टमध्ये दावा

Mumbai To Akola: मुंबईहून अकोल्याला पोहोचण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? प्रवासाचे टॉप ५ पर्याय आणि टिप्स

SCROLL FOR NEXT