Nana Patekar Upcoming Web Series Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar Want To Work In Malayalam Film: यशस्वी अभिनेता होऊनही नाना पाटेकरांची ‘ही’ इच्छा अपूर्णच; अभिनेत्याने व्यक्त केली खंत

Nana Patekar News: गेल्या 50 वर्षांमध्ये केरळमधील एकाही दिग्दर्शकाने त्यांच्याकडे चित्रपटासाठी संपर्क साधला नाही, अशी खंत नाना पाटेकर यांनी व्यक्त केली आहे.

Chetan Bodke

Nana Patekar Want To Work In Malayalam Film

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय सिनेसृष्टीमध्ये, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सक्रिय आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

अभिनेते नाना पाटेकरांनी केरळच्या २८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कार्यक्रमामध्ये, मल्याळम फिल्म इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये केरळमधील एकाही दिग्दर्शकाने त्यांच्याकडे चित्रपटासाठी संपर्क साधला नाही, अशी खंत नाना पाटेकर यांनी व्यक्त केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकताच नाना पाटेकर यांचा मुख्य भूमिकेत असलेला ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट रिलीज झाला. त्यांच्या ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. नाना पाटेकर यांनी नुकतंच केरळच्या २८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

या महोत्सवामध्ये नाना पाटेकर म्हणाले, “मला या फिल्म फेस्टिव्हलसाठी आमंत्रित केल्यामुळे मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. ३२ वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या शुटिंगकरिता मी केरळमध्ये आलो होतो. तेव्हापासून ते आजवर सामाजिक-राजकीय परिस्थितीत केरळमध्ये काहीही बदल झालेले नाहीत. केरळमध्ये लोकं मनापासून अधिक विचार करतात. त्यामुळे भाषा जरी बोलण्यासाठी वेगळी असली तरी बोलणं फार सोपं आहे... हे असंच असायला हवं...”

मराठी आणि बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट देणाऱ्या नाना पाटेकर यांनी या फिल्म फेस्टिव्हल दरम्यान, मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. माझी मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. “माझ्या ५० वर्षांच्या सिनेकारकिर्दित मला केरळमधल्या एकाही दिग्दर्शकाने मल्याळम चित्रपटासाठी अप्रोच केलं नाही. याचा अर्थ असा की, मला माझ्या अभिनयामध्ये काही बदल करावा लागेल. मी नक्कीच माझ्या कामासाठी पूर्णपणे प्रयत्न करत राहिल. मी प्रेक्षकांना कधीही निराश करणार नाही.” असं फिल्म फेस्टिव्हलमध्ये संवाद साधताना नाना पाटेकर म्हणाले.

नाना पाटेकरांच्या कामाबद्दल बोलायचे तर, ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. पण त्या चित्रपटाला चाहत्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट करोना काळात शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या स्वदेशी लस निर्मितीवर आधारित आहे.

नाना पाटेकर कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दित एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: साकोलीत नाना पटोले पिछाडीवर

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT