The Vaccine War Teaser Out
The Vaccine War Teaser OutSaam TV

The Vaccine War Teaser Out: 'द व्हॅक्सिन वॉर'चा रहस्यमय टीझर आऊट; नाना पाटेकर-पल्लवी जोशींचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार

Vivek Agnihotri: द व्हॅक्सिन वॉर: अ ट्रू स्टोरी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Published on

The Vaccine War Released Date Out :

विवेक अग्निहोत्रीने नुकतीच X (ट्विटर)वर पोसत केली आहे. चाहत्यांना त्याच्या आगामी द व्हॅक्सिन वॉर: अ ट्रू स्टोरी चित्रपटाची रिलीज डेट निवडण्याचे आवाहन केले होते.

मंगळवारी, चित्रपट निर्मात्याने टीझर शेअर करत चित्रपटाची नवीन रिलीज डेट शेअर केली आहे. द व्हॅक्सिन वॉर: अ ट्रू स्टोरी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आधी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार होता.

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "डेट अनाउन्समेंट: प्रिय मित्रांनो, तुमचा चित्रपट द व्हॅक्सिन वॉर: अ ट्रू स्टोरी 28 सप्टेंबर 2023 या शुभ दिवशी जगभरात प्रदर्शित होईल. कृपया आम्हाला आशीर्वाद द्या."

The Vaccine War Teaser Out
Hrithik-Deepika Share Fighter Update: स्वातंत्र्यदिनी 'फायटर'चे दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित; हृतिक रोशन - दीपिका पदुकोणच्या लूकची प्रेक्षकांना भुरळ

13 ऑगस्ट रोजी विवेकने ट्विट केले होते की, "शेवटी, वॅक्सीन वॉर पूर्ण झाले. हा भारतातील पहिला जैव-विज्ञान चित्रपट आहे. आता हा चित्रपट कधी रिलीज होणार याबद्दल विचार करत आहात?" या चित्रपटात अनुपम खेर, नाना पाटेकर, रायमा सेन आणि पल्लवी जोशी इत्यादी कलाकार आहेत.

द व्हॅक्सिन वॉर: अ ट्रू स्टोरी

या वर्षी जूनमध्ये चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलची सुरुवात जाहीर केली होती, ही सत्य घटनांवर आधारित कथा असल्याचे म्हटले जात आहे, यापूर्वी अशी चर्चा होती की चित्रपटाच्या रिलीजची तारीख यावर्षी 15 ऑगस्ट ते 24 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलून दसऱ्याच्या करण्यात आली होती.

विवेकने शेवटच्या शेड्यूलच्या शूटचे काही क्षण ट्विटरवर शेअर केले होते आणि लिहिले होते, "देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने, द व्हॅक्सिन वॉर: अ ट्रू स्टोरी शेवटच्या शेड्यूलची सुरुवात झाली आहे." (Latest Entertainment News)

काय आहे द व्हॅक्सिन वॉर: अ ट्रू स्टोरी?

द काश्मीर फाइल्सच्या यशानंतर , दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने नोव्हेंबर 2022 मध्ये त्याच्या पुढील चित्रपट, द व्हॅक्सिन वॉरची घोषणा केली होती. या चित्रपटाबद्दल त्यांनी जास्त काही माहिती दिली नसली तरी, द व्हॅक्सिन वॉरमुळे भारतीय जैव-शास्त्रज्ञांबद्दल काही धक्कदायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. कोविड-19 च्या काळात वैद्यकीय बंधुत्व आणि शास्त्रज्ञांच्या समर्पणाला या चित्रपटातून मानवंदना अर्पण केली आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना, विवेक रंजन अग्निहोत्री यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले होते की, “जेव्हा कोविड लॉकडाऊन दरम्यान काश्मीर फाइल्स पुढे ढकलण्यात आल्या, तेव्हा मी त्यावर संशोधन सुरू केले. मग आम्ही ICMR आणि NIV च्या शास्त्रज्ञांसोबत संशोधन सुरू केले ज्यांनी आमची स्वतःची लस बनवून दाखवली.

त्यांच्या संघर्षाची आणि बलिदानाची कहाणी जबरदस्त होती आणि संशोधन करताना आम्हाला समजले की या शास्त्रज्ञांनी केवळ परदेशी एजन्सींनीच नव्हे तर आपल्या लोकांविरुद्धही भारताविरुद्ध युद्ध कसे लढले. तरीही, आम्ही सर्वात वेगवान, स्वस्त आणि सुरक्षित लस बनवून महासत्तांवर विजय मिळवला. प्रत्येक भारतीयाला त्यांच्या देशाचा अभिमान वाटावा यासाठी ही कथा सांगितली पाहिजे असे मला वाटले."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com