Nana Patekar Slapped Fan Video Viral Twitter
मनोरंजन बातम्या

Nana Patekar Slaps Fan: सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्याला नाना पाटेकरांनी फटकावले; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Nana Patekar Viral Video: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील आपल्या चाहत्यासोबत असभ्य वर्तन करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Chetan Bodke

Nana Patekar Slapped Fan Video Viral

आपला आवडता सेलिब्रिटी आपल्या समोर उभा आहे हे पाहून चाहत्यांना त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. या सेलिब्रिटींच्या भोवती फोटो काढण्यासाठी नेहमी चाहत्यांची मोठी गर्दी असल्याचे आपण पाहिले आहे.

चाहत्यांना पाहून काही सेलिब्रिटी त्यांना सेल्फी घेण्यास देतात. पण काही सेलिब्रिटी असे आहेत जे सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांना विचित्र वागणूक देतात. त्यामुळे हे सेलिब्रिटी सोशल मीडियावर ट्रोल होतात.

अशामध्ये आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील आपल्या चाहत्यासोबत असभ्य वर्तन केल्याचे दिसून आले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटिझन्सनी नाना पाटेकरांना चांगलेच फटकारले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिनेते नाना पाटेकर यांचा स्वभाव अनेकांना ठाऊक आहे. आपल्या स्वभावामुळे ते कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहतात. नाना पाटेकरांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये, नाना पाटेकर शूटिंगच्या ठिकाणी एका सीनसाठी रेडी होताना दिसत आहेत.

तितक्यात त्यांच्याजवळ त्यांचा एक चाहता येतो आणि त्यांच्याकडे सेल्फीची मागणी करतो. ते शुटिंगमध्ये व्यग्र होते. शुटिंगमध्ये चाहत्याने व्यत्यय आणल्यामुळे त्यांनी चाहत्याच्या थेट कानाखालीच मारलीय.

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील काशीमधील शुटिंग दरम्यानचा आहे. सध्या नानांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे.

व्हिडीओमध्ये पुढे, युनिटमधली माणसं त्या तरुणाला बाहेर काढतात. त्यानंतरच नानांचा राग शांत झालेला दिसला. नाना चाहत्याला मारत असलेला हा व्हिडीओ, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर जोरदार व्हायरल होतोय. हा व्हिडीओ तुसीफ शेख नावाच्या एका चाहत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. सध्या नाना वाराणसीतल्या दशाश्वमेध घाटावर ‘जर्नी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. नुकताच चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. (Social Media)

नाना पाटेकरांच्या कामाबद्दल बोलायचे तर, ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. पण त्या चित्रपटाला चाहत्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट करोना काळात शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या स्वदेशी लस निर्मितीवर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT