Mithun Chakraborty Complains Of Chest Pain Hospitalized Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mithun Chakraborty Hospitalized: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली, कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरू

Mithun Chakraborty Health Update : लोकप्रिय आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या अचानक छातीमध्ये दुखू लागल्याने कोलकात्यातील एका खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

Chetan Bodke

Mithun Chakraborty Complains Of Chest Pain Hospitalized

लोकप्रिय आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीविषयी महत्वाची बातमी समोर येत आहे. अभिनेत्याला शनिवारी अर्थात आज सकाळी घरी असताना अचानक छातीत दुखू लागल्यामुळे आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना कोलकात्यातील अपोलो रूग्णालयाध्ये दाखल करण्यात आले. सध्या मिथुन चक्रवर्ती यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. (Bollywood)

त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करीत आहेत. ७३ वर्षीय मिथुन यांना मध्यरात्रीच स्ट्रोक आला होता. त्यानंतर लगेचच अभिनेत्याला रूग्णालयाध्ये दाखल करण्यात आले. सध्या अभिनेत्यावर रुग्णलयातल्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. अद्याप तरी अभिनेते मिथुन यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही . नुकतेच मिथुन यांना चित्रपटसृष्टीतील अमुल्य योगदानासाठी देशाच्या प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (Mithun Chakraborty)

मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या सिनेकारकिर्दित स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनय आणि डिस्को डान्सर अभिनेता म्हणून त्यांची ओळख इंडस्ट्रीत आहे. त्यांच्या आजवरच्या करिअरमध्ये त्यांनी ३५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. (Bollywood News)

मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना पुर्वी राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. आपल्या सिनेकरिअरमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिथुन यांना आपल्या सिनेकारकिर्दीत एकूण 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT