आजवर अनेक मालिका आणि चित्रपट इच्छाधारी नाग-नागीणवर झाले आहेत. याला प्रेक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात बदल्याची भावना पाहायला मिळायची. अशीच धमाकेदार कथा घेऊन आता नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा चॉकलेट बॉय इच्छाधारी नागाच्या रुपात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाला आहे.
नवीन वर्षात 'नागझिला' (Naagzilla ) नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा 'हँडसम हंक' हिरो कार्तिक आर्यन इच्छाधारी नागाच्या भूमिकेत झळकणार आहे. कार्तिक आर्यन नेहमीच आपल्या भूमिकांनी चाहत्यांना वेड लावतो. कधी तो रूह बाबा होतो तर कधी वेडा प्रियकर. प्रत्येक पात्रात कार्तिक आर्यन जीव ओततो. नुकताच कार्तिक आर्यनने 'नागझिला' टीझर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
'नागझिला' टीझरला कार्तिकने (Kartik Aaryan) हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "इंसानों वाली पिचरें तो बहुत देख लें, अब देखो नागों वाली पिचर...'नागझिला' -नाग लोक का पहला कांड... फ़न्न फ़ैलाने आ रहा हूँ मैं, नागपंचमी पर...आपकी नज़र" त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. टीझरमध्ये कार्तिक बोलताना दिसत आहे. तो म्हणतो की, "इच्छाधारी नाग, रुप बदलने की शक्ती रखनेवाला साप, जैसे की मैं... प्रेमवदेश्वर प्यारे चंद…उम्र ६३१ साल, इन्सानो वाली पिक्चर बहुत देखी है, अब देखो नागो वाली पिक्चर…फन फैलाने आ रहा हूँ…नागपंचमीपर"
'नागझिला' टीझर पाहून हा चित्रपट कॉमेडी असल्याचे बोले जात आहे. 'नागझिला' चित्रपट पुढच्या वर्षी 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे. चित्रपटात कार्तिक आर्यन नागाच्या भूमिकेत दिसत असून नागीणीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री पाहायला मिळणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.