John Abraham SAAM TV
मनोरंजन बातम्या

John Abraham Birthday : अलिशान घर अन् महागड्या गाड्या, बॉलिवूडचा 'हँडसम हंक' जॉन अब्राहम किती कोटींचा मालक?

John Abraham Net Worth : बॉलिवूडचा 'हँडसम हंक' जॉन अब्राहम आपल्या फिटनेस आणि लूकसाठी ओळखला जातो. आज जॉन अब्राहम ५२ वर्षांचा झाला आहे. आपल्या करिअरच्या एवढ्या वर्षात त्याने किती कोटींची मालमत्ता कमावली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) यांनी आपल्या अभिनय शैलीने चाहत्यांना वेड लावले आहे. आज तरुणाईमध्ये जॉन अब्राहमची क्रेझ पाहायला मिळत आहे. इंडस्ट्रीमध्ये जॉन अब्राहमला 'हँडसम हंक' म्हणून ओळखले जाते. अभिनेता जॉन अब्राहमने अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा आज वाढदिवस आहे. जॉन अब्राहम 52 वर्षाचा झाला आहे.

अभिनेता जॉन अब्राहमने खूप कष्टातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी जॉन अब्राहम फक्त ६ रुपये खर्च करत असे. अनेक वेळा तो रात्री उपाशीपोटी देखील झोपला आहे. त्यावेळी अभिनेता मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करायचा. मनोरंजन सृष्टीत आल्यावर जॉन अब्राहमला हळूहळू ओळख मिळायला लागली आणि आता तो कोटींचा मालक आहे.

जॉन अब्राहम संपत्ती

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जॉन अब्राहम चित्रपटासोबतच जाहिराती आणि प्रॉडक्शन हाऊसमधून कोट्यावधींची कमाई करतो. मीडिया रिपोर्टनुसार, जॉन अब्राहमची मालमत्ता (Net Worth ) 251 कोटींच्या वर आहे. जॉन अब्राहमकडे सी-फेसिंग पेंटहाऊस आणि लेम्बोर्गिनी गॅलार्डो आलिशान कार आहे. तो एक लग्जरी लाइफस्टाइल जगत आहे. जॉन अब्राहम एका फुटबॉल टिमचा मालक आहे. त्याचा मुंबईतील आलिशान घर आहे. बांद्रा येथे डुप्लेक्स अपार्टमेंट आहे.

जॉन अब्राहमने २००३ मध्ये 'जिस्म' या चित्रपाटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याचे आजवर धूम, शूटआउट ॲट वडाला, पठाण हे चित्रपट खूप गाजले आहे. जॉन अब्राहमचा मोठा चाहता वर्ग आहे. तो खूप आपल्या फिटनेसची काळजी घेतो. आपल्या लूकने तो नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो. फिटनेस संबंधित तो आपले व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज खा हे पदार्थ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

Black Neck Removal Tips: मानेवरचा काळेपणा कसा घालवायचा? या 3 सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

Drinking Warm Water: खरंय का? गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो का? तज्ज्ञांनी सांगितले, शरीरात काय बदल होतात?

SCROLL FOR NEXT